राणे कुटुंबीय म्हणजे ‘खोबर तिकडं चांगभलं’…ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याचा राणेंवर हल्लाबोल

Sharad Koli Criticize BJP Minister Narayan Rane : राणे कुटुंबीय आणि ठाकरे कुटुंबीय यांच्यामधील वाद हा संपूर्ण राज्याला माहित आहे. दोन्ही कुटुंबातील नेतेमंडळी एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडत नाही. यातच राणेंकडून ठाकरेंवर करण्यात आलेल्या टीकेला ठाकरे गटाच्या एका पदाधिकाऱ्याने उत्तर दिले आहे. राणे कुटुंबीय म्हणजे ‘खोबर तिकडं चांगभलं’ होय. तसेच शेतकरी ज्या […]

Untitled Design   2023 05 05T141917.841

Untitled Design 2023 05 05T141917.841

Sharad Koli Criticize BJP Minister Narayan Rane : राणे कुटुंबीय आणि ठाकरे कुटुंबीय यांच्यामधील वाद हा संपूर्ण राज्याला माहित आहे. दोन्ही कुटुंबातील नेतेमंडळी एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडत नाही. यातच राणेंकडून ठाकरेंवर करण्यात आलेल्या टीकेला ठाकरे गटाच्या एका पदाधिकाऱ्याने उत्तर दिले आहे. राणे कुटुंबीय म्हणजे ‘खोबर तिकडं चांगभलं’ होय. तसेच शेतकरी ज्या पद्धतीने शेतात सालगडी ठेवतात त्या पद्धतीने भाजपने नितेश राणेला राजकारण खराब करण्यासाठी सालगडी म्हणून ठेवले असल्याची टीका ठाकरे गटाचे राज्य विस्तारक शरद कोळी यांनी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्या आरोप प्रत्यारोपामुळे ढवळून निघाले आहे. त्यातच सध्या विरोधकांवर टीका करण्यासाठी भाजपकडून राणे कुटुंबियांनी पुढाकार घेतला आहे. दरदिवशी राणे कुटुंबियांकडून विरोधकांसह ठाकरे कुटुंबांवर निशाणा साधला जात असतो. दरम्यान राणे यांच्या वक्तव्यांचा ठाकरे गटाचे पदाधिकारी शरद कोळी यांनी चांगलाच खरपूस समाचार घेतला आहे.

यावेळी बोलताना कोळी म्हणाले, खासदार संजय राऊतांवर राणे यांच्याकडून टीका केली जात आहे. राऊत आग लावण्याचे काम करत नाही. तर राणे कुटुंबीयांचं आग लावण्याचं काम करतात. त्यांचे ‘आगलावे’ आडनाव पाहिजे होतं, यांनीच अख्या महाराष्ट्रातील राजकारणात आग लावण्याचे काम केलं आहे, अशी टीका कोळी यांनी केली आहे.

Serbia Shooting: धक्कादायक! सातवीतल्या मुलाकडून शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 विद्यार्थी ठार

पुढे बोलताना कोळी म्हणाले, महाराष्ट्रातील राजकारण गटारी सारखं गढूळ राणे यांच्यामुळे झाले आहे. काही बोललं तर ते त्यांच्या लक्षात राहत नाही. राणे कुटुंबीय म्हणजे खोबर तिकडे चांगभलं असे करत आहेत. म्हणजेच सत्ता तिकडे हे कुटुंबीय असे आहे. तसेच शेतकरी ज्या पद्धतीने शेतात सालगडी ठेवतो, त्या पद्धतीने भाजपने नितेश राणे यांना राजकारण खराब करण्यासाठी सालगडी म्हणून ठेवले आहे. अशा शब्दात ठाकरे गटाचे पदाधिकारी शरद कोळी यांनी राणे कुटुंबियांवर जोरदार टीका केली आहे.

Exit mobile version