Download App

माझ काय वय झालं का? म्हणणारे शरद पवार प्रचाराच्या मैदानात! महाराष्ट्रभर सभांचा धडाका

  • Written By: Last Updated:

Sharad Pawar Lok Sabha Campaign Schedule: लोकसभेच्या वातावरणाने भर उन्हाळ्यात चांगलीच गरमी वाढवलीये. सध्या देशभरात मोदी विरूद्ध इंडिया आघाडी असं वातावरण तापलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्याकडून वारंवार 400 पार’चा नारा दिला जातोय. तर, इंडिया आघाडीकडून ‘अब की बार भाजप तडीपार अशी घोषण दिली जातीये.’ अशा वातावरणात महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नुकतेच दोन शकलं झालेली आहेत. त्यानंतरही शरद पवार (Sharad Pawar) भाजप आणि संपूर्ण महायुतीच्या विरोधात आपण ठाम उभं असल्याचं वारंवार दाखवून देत आहेत.

 

तब्बल 50 सभा घेणार

दुसऱ्या तिसऱ्या कुणीही नाही तर स्वत: पुतणे असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) अेकदा शरद पवार आता 83 वर्षांचे आहेत. त्यांनी आता मार्गदर्शकाच्या भूमिकेत जावं. आम्हाला मार्गदर्शन करावं असं म्हणत पवारांच्या वयाचा दाखला दिला आहे. मात्र, ‘तुम्ही माझ काय पाहिलं’ असं म्हणत पवारांनी वारंवार आपल्या वायाचा आणि कामाचा काही संबंध नसल्याचं दाखवून दिलंय. या गोष्टीचा आपल्याला दाखला देण्याचं कारण म्हणजे सध्या होत असलेल्या लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत शरद पवार एक नाही, दोन नाही तर तब्बल 50 सभा घेणार आहेत.

 

मुळ पवार कोण आणि बाहेरचं पवार कोण

महाराष्ट्रात काही ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि भाजप असा थेट संघर्ष होत आहे. तर बाकी ठिकाणी महाविका आघाडी विरूद्ध महायुती असा संघर्ष आहे. यामध्ये बाहेरच्या संघर्षापेक्षा पवारांच्या घरातला संघर्ष आता शिगेला गेल्याचं चित्र आहे. नणंद विरुद्ध भावजयी असा हा संघर्ष राहिला नसून तो आता ‘मुळ पवार कोण आणि बाहेरचं पवार कोण’ या टोकाला गेल्याचं सध्याचं वातावरण आहे. मात्र, हे सगळं सुरू असताना भाजपला आपल्याला सत्तेतून बाहेर करायचं आहे असं वारंवार बोलणाऱ्या पवारांनी आता चांगलीच कंबर कसल्याचं दिसतय. कुणी वयावरून कितीही टीका केली तरी त्याला दाद न देता पवार मोठ्या उत्साहाने लोकसभेच्या रणसंग्रामात लढायला उतरले असल्याचं पाहायला मिळत आहे.

 

पावासाच्या सभेचा दाखला 

शरद पवारांच्या या मॅरेथॉन दौऱ्यात सुमारे 22 दिवसांत तब्बल 50 सभा घेणार आहेत. यामध्ये 18 एप्रिलपासून ते आपल्या बारामती या होम ग्राऊंडवरून राजकीय फटकेबाजीला सुरूवात करणार आहेत. दिवसाला सुमारे 4 ते 5 सभा घेण्याचं त्यांचं नियोजन आहे. रावेर, शिरूर, बीड, पुणे, अहमदनगर, बारामती, माढा, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर या शहरांसह इतरही भागात शरद पवारांच्या सभा होणार आहेत. यामध्ये 2019 ला सातारा लोकसभेचे त्यावेळचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे यांनी अचानक पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याने तेथे पोट निवडणूक झाली होती. त्यावेळी पवारांची पावसातील सभा मोठी गाजली होती. तसंच, त्या सभेनंतर वातावरण बदलंलं आणि उदयन राजेंचा मोठ्या फरकाने पराभव करत राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील निवडणून आले होते. या सभेचा दाखला अनेक ठिकाणी वारंवार दिला जातो.

 

अजित पवारांच बंड

शिवसेनेत बंड करत एकनाथ शिंदे भाजपसोबत गेल्याने मोठी भावनिक लाट उद्धव ठाकरे यांच्याबाबत असल्याचं चित्र कायमच पाहायला मिळालं आहे. तसाच, प्रकार राष्ट्रवादीमध्ये झाला आहे. अजित पवारही पक्षातील सुमारे 40 आमदार सोबत घेऊन भाजपासोबत गेल्याने राष्ट्रवादीचे दोन शकलं झाली. त्यानंतर, त्यांनी वारंवार पवारांच्या वयाचा उल्लेख केला.त्यामुळे वातावरण अधिकच चिघळलं आणि पवारांच्या बाजूने काही प्रमाणात भावनिक लाट निर्माण झाल्याचं चित्र निर्माण झालं. त्याचं वातावरणात पवार पायाला भिंगरी लाऊन महाराष्ट्रभर दौरे करत आहेत. तसंच, आता निवडणुकांचं वार सुरू असल्याने पवार पुन्हा एकदा तितक्याचं ताकतीने आणि उत्साहाने मैदानात उतरणार असं त्यांच्या नियोजित दौऱ्यावरून दिसून येत आहे. आता या लढाईत कोण बाजी मारतो हे पाहण महत्वाचं ठरणार आहे.

पवार कुठं-कुठं घेणार सभा

बारामती, शिरूर, मावळ, पुणे, मनमाड, चोपडा,रावेर,मोर्शी, हिंगणघाट,अलिबाग, कुर्डूवाडी,वाई, भोर, माजलगाव, दौंड,करमाळा-टेंभूर्णी, सांगोला, पंढरपूर, दहिवडी, उरळी कांचन, श्रीगोंदा, सासवड, कोरेगाव, वारजे, फडटण, पाटण, जामनेर, मुक्ताईनगर, औरंगाबाद, राहुरी, नीरा, कराड, काल्हापूर, सातारा, इंदापूर, शिवगोरक्ष, रांजणगाव, पारनेर, बीड, चाकण, पुणे, अंबेजोगाई, अहमदनगर

 

follow us