Jayant Patil : पारनेरचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) शरद पवार (Sharad Pawar) गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. अशातच आज त्यांनी पुण्यात शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी शरद पवार आणि निलेश लंके यांनी एक पत्रकार परिषदे घेतली. या पत्रकार परिषदेत बोलतांना जयंत पाटील यांचं वाक्य शरद पवारांना खटकलं. त्यामुळं पाटील (Jayant Patil) यांना आपले शब्द लगेच मागे घ्यावे लागले.
‘साहेब सांगतील तो आदेश’; पत्रकार परिषदेत लंकेंनी एकदाचं सांगूनच टाकलं
निलेश लंके यांच्या पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, निलेश लंके हे यावेळी उपस्थित होते. यावेळी जयंत पाटील यांनी आमदार निलेश लंके यांचं कौतुक केलं. यावेळी घडलेली एक घटना सध्या चर्चेचा विषय ठरली. शरद पवार यांनी वयाची ऐंशी ओलांडली असली तरी आजही तरुणांना लाजवेल, अशा उत्साहाने काम करतात. हीच बाब जयंत पाटलांनी बोलून दाखवली.
चव्हाणांनी 25 वर्ष जोर लावून चिखलीकरांना विरोध केला… आता त्यांच्याच विजयासाठी मते मागावी लागणार!
पाटील म्हणाले, निलेश लंके आज शरद पवारांना भेटायला आले. त्यांनी शरद पवार यांच्या विचारांनी काम करायचे ठरवले. निलेश लंके यांच्यासारख्या अनेक तरुणांना शरद पवार यांच्या नेतृत्वाची भुरळ आहे. आज इतकं वय झांलं असलं तरी शरद पवार तरुणांना लाजवेल, असं काम करतात, असं पाटील यांनी म्हणताच पवारांनी त्यांच्याकडे कटाक्ष टाकला आणि ‘अय…’ अशी हाक मारत जयंत पाटलांना थांबवलं.
शरद पवारांना त्यांचं वय झालं, याचा उल्लेख आवडत नाही, ही बाब जयंत पाटलांच्या चटकन लक्षात आली. त्यामुळं जयंत पाटली हे पवारांकडे पाहून हसायला लागले आणि मी माझं वाक्य मागं घेतो, असं म्हटलं. यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
यानंतर जयंत पाटील यांनी शरद पवार किती मेहनत घेत आहेत हे सविस्तर सांगितलं. काल शरद पवार निफाडच्या बैठकीसाठी नाशिकला गेले होते. यानंतर ते रात्री दीड वाजेपर्यंत जळगावातून येणाऱ्या सर्वांना भेटत होते. त्यानंतर सकाळी आठ वाजता ते राहुल गांधींच्या कार्यक्रमाला गेले. त्यानंतर शरद पवार विश्रांती न घेता येथे आले आहेत. त्यांचा हा अथक काम करण्याचा स्वभाव सगळ्यांना प्रेरणा देणारा आहे, असं पवार म्हणाले.