Download App

‘वळसे पाटलांनी संधीसाधूपणा केला, दुसरं काही नाही…’, शरद पवारांचे टीकास्त्र

मंत्री दिलीप वळसे पाटलांवर शरद पवारांनी जोरदार निशाणा साधला. वळसे पाटलांनी संधीसाधूपणा केला, दुसरं काही नाही, अशी टीका पवारांनी केली.

  • Written By: Last Updated:

Sharad Pawar on Dilip Walse Patil : आगामी विधानसभा (Vidhansabha Election) निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली. शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार (Sharad Pawar) स्वत: अनेक मतदारसंघात फिरत आहे. आज शिरुरच्या दौऱ्यावर असतांना पवारांनी मंत्री दिलीप वळसे पाटलांवर (Dilip Walse Patil) जोरदार निशाणा साधला. वळसे पाटलांनी संधीसाधूपणा केला, दुसरं काही नाही, अशी टीका पवारांनी केली.

PCB चा आयसीसीला इशारा, चॅम्पियन्स ट्रॉफीत हायब्रीड मॉडेल नाहीच; टीम इंडिया काय करणार? 

शरद पवारांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. आंबेगावचा 40 टक्के भाग सिंजनापासून वंचित असतांना डिंबे धरणाचं पाणी कर्जत जाखमेखडला दिल्या जातं आहे, याविषयी पवारांना विचारलं असता ते म्हणाले की, आंबेगाव तालुक्याला पाण्याची गरज असेल तर सरकारने त्याची पूर्तता केली पाहिजे. या भागातील लोकप्रतिनिधींना अनेक वर्ष संधी देऊनही त्यांना प्रश्न सोडवता आले नाहीत. सरकारने जनतेलला न्याय दिला पाहिजे. न्याय मिळत नसेल तर सत्ता हाती घ्यावी लागले, असं पवार म्हणाले.

अहमदनगर नामांतराचा विषय पुन्हा पेटला; औरंगाबाद खंडपीठात विरोध करणारी जनहीत याचिका दाखल 

दिलीप वळसे पाटील यांनी पवारांची साथ सोडत अजित पवारांबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेत गेल्याचं वळसे पाटील सांगत आहे. याविषयी बोलतांना पवार म्हणाले, आंबेगाव तालुक्यात 30-40 वर्षापूर्वी पाण्याची स्थिती काय होती आणि आज काय आहे? दिलीप वळसे पाटील किती वर्षे मंत्री आहेत? 35 वर्ष आमदार,25 वर्षे मंत्री राहिलेले आहे. या 25 वर्षात त्यांना आजतागायत प्रश्न सोडवता आला नाही आणि आता ते प्रश्नाची सोडवणूक कऱण्यासाठी सत्तेत गेल्याचं सांगतात. हा संधीसाधूपणा आहे, दुसरं काही नाही, अशी टीका पवारांनी केली.

राजकारणात फडतूस माणसे असतात
अतुल बेनकेंनी आज मोठा दावा केला. विधानसभा निवडणुकीपर्यंत काहीही होऊ शकते. दोन्ही गटही एकत्र येऊ शकतात, असं विधान त्यांनी केलं. त्याविषयी विचारलं असता पवार म्हणाले की, कोण अतुल बेनके? हे कोण आहेत? पक्षाच्या अध्यक्षाने उत्तर द्यावं, एवढा महत्वाचा माणूस आहे का? पत्रकारांनी कोणाबद्दल प्रश्न विचारावा, याचे काही तारतम्य ठेवावं. राजकारणात फडतूस माणसे असतात. ते काहीही विधानं करतात, त्यांची नोंद घ्यायची नसते.

follow us