Download App

‘मी तसं बोललो नव्हतो…’, शरद पवारांचे ‘मूळ पवार बाहेरचे पवार’ वक्तव्यावर स्पष्टीकरण

  • Written By: Last Updated:

Sharad Pawar : अजित पवारांच्या (Ajit Pawar) वक्तव्याला प्रत्युत्तर देतांना शरद पवारांनी (Sharad Pawar) मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार, असं वक्तव्य केलं होतं. त्यावरून शरद पवारांना टीकेचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, आता खुद्द शरद पवारांनी आपल्या वक्तव्यावर स्षष्टीकरण दिलं. आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचं पवार म्हणाले. तसंच आपण तसं वक्तव्यच केलं नव्हतं, असंही पवार म्हणाले.

देशाला परिवर्तनं हवंय! मोदींची शक्ती कमी करणं देशाची गरज…; पवारांचे टीकास्त्र 

महायुतीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शरद पवार आज साताऱ्यात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, ‘मी तसं बोललो नव्हतो. अजित पवार आपल्या भाषणात म्हणाले की, मला (अजित पवारांना) निवडून दिलं. ताईंना (सुप्रिया सुळेंना) निवडून दिलं. आता सुनेला निवडून द्या. पुढं त्यांनी आणखी काही वाक्य वापरलं. त्यासंबंधी मी फक्त स्पष्टीकरणं केलं. त्याचा वेगळा अर्थ काढायची गरज नव्हती, असं पवार म्हणाले.

भाईजानच्या घरावरील गोळीबारानंतर शिवची प्रतिक्रिया; म्हणाला, ‘ऊपर वाले की और हमारी दुआ..’ 

ते म्हणाले, महिलांच्या हितासंबंधी इश्शू असेल तर या देशात महिला आरक्षणाबाबत निर्णय घेणारा मी पहिला मुख्यमंत्री होतो. सरकारी सेवांमध्ये महिलांना विशिष्ट आरक्षण देण्याचा निर्णय माझा होता. केंद्र सरकारमध्ये संरक्षण मंत्री असताना तीनही दलात मुलींना सहभागी करून घेण्याचा निर्णय मी घेतला. महिलांना सन्मान प्रतिष्ठा मिळावी यासाठी आम्ही अनेक निर्णय घेतल्याचेही शरद पवार म्हणाले.

नेमकं काय म्हणाले होते शरद पवार?
बारामतीच्या प्रचार सभेत अजित पवार म्हणाले की, आजपर्यंत तुम्ही वडिलांना म्हणजे, पवार साहेबांना मत दिल. मुलाला म्हणजे, मला आणि मुलीला म्हणजे सुप्रिया सुळेंना मतदान केलं. आता सूनेला मतदान करायचं, ज्या ठिकाणी पवार हे नाव दिसेल, त्या ठिकाणी मतदान करा, असं आवाहन अजितदादांनी केलं. त्यावर बोलतांना शरद पवार म्हणाले, पवारांनाच मतदान करा हे अजित पवारांचे मत योग्य आहे, पण मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार हे वेगवेगळे आहेत, असे शरद पवार म्हणाले.

follow us