Download App

सगळं बघतो, 56 वर्ष सतत निवडून येणारा माझ्याशिवाय कोणी दाखवा; पवारांनी थोपटले दंड

Sharad Pawar बारामती मधील कोऱ्हाळे खुर्दमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधला यावेळी त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली.

Image Credit: letsupp

Sharad Pawar Criticize PM Modi : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी बारामती मधील कोऱ्हाळे खुर्द या गावांमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधला यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून केंद्रातील मोदी सरकारवर (PM Modi) टीका केली. पवार म्हणाले की, महाराष्ट्रची सत्ता हाती घेतल्यानंतर ऊसाला भाव कसा मिळत नाही? दुधाचे पैसे कसे मिळत नाहीत? हे सगळं बघतो, आता हा बघायचा अनुभव मला फार आहे. आज हिंदुस्थानामध्ये किंवा राज्यामध्ये 56 वर्ष सतत निवडून येणारा कोण माझ्याशिवाय कोणतरी दाखवा आणि हे काम तुम्हीच चमत्कार केलात.

विधानसभा निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीसांवरच ठाम विश्वास; दिल्लीत झाला मोठा निर्णय

तसेच यावेळी पवार म्हणाले की, आज देशामध्ये मोदींचे राज्य आहे. महाराष्ट्रामध्ये भाजपा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे राज्य आहे. आमची तक्रार एकच आहे की हा देश 70% शेतकऱ्यांचा देश आहे. त्यामुळे सरकार चालवायचा असेल तर पहिलं या देशातल्या 130 कोटी जनतेला दोन वेळचा अन्न सन्मानाने देता येईल असे चालले पाहिजे आज ते होत नाही. उसाच्या किमतीचे प्रश्न आहेत, उसापासून आपण साखर बनवतो. साखरेची गरज भागवून जर उत्पन्न जास्त झाले तर आपण जगात पाठवतो.

अभिनयासह उद्योगातही Sunny Leone चा ठसा; बेंगळुरूमध्ये लाँच केला कॉस्मेटिक ब्रॅंड

या सरकारने साखर जगात पाठवायला बंदी घातली. मळी पासून इथेनॉल नावाचा पदार्थ आपण तयार करतो तो पेट्रोलमध्ये घालतो त्याच्यावर गाडी चालते आणि सगळं चालतं. तर इथेनॉलचा आपण कारखाना माळेगाव कारखाना, सोमेश्वर कारखाना याला धरून उभा केला. दोन पैसे मिळाले पण मोदी सरकारने त्याच्यावर बंदी घातली. त्याचा परिणाम हा झाला की ऊस त्याची साखर, मळी पासून इथेनॉल त्यावरील बंदी दोन पैसे कमी या सगळ्यांचे परिणाम म्हणून उसाची किंमत घसरली. पण उत्पादन खर्च कमी झालं नाही त्यामुळे शेतकरी अडचणीत आहे.

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

त्यामुळे आपल्याला देशाचं व राज्याचं चित्र बदलायचा आहे. आज आम्ही या देशात राज्यात निवडणुका लढवताना शिवसेनेला बरोबर घेतलं, काँग्रेसला घेतलं आणि आम्ही लोक बरोबर राहिलो ४८ खासदारांच्या जागा आहेत, 31 निवडून आल्या. मी दहा खासदारांची उमेदवार उभे केले आठ निवडून आले लोकांच्या पाठिंब्याने. त्याचा अर्थ हा आहे लोकांना बदल पाहिजे जर तो बदल मिळाला तर तुमचा संसार सुधारेल. त्यासाठी एकच काम मी असं ठरवलं काही झालं तरी उद्याच्या निवडणुकीत त्याच्यात महाराष्ट्राची सत्ता हातात घ्यायची.

महाराष्ट्रची सत्ता घेतल्यानंतर ऊसाला भाव कसा मिळत नाही? दुधाचे पैसे कसे मिळत नाहीत? हे सगळं बघतो, आता हा बघायचा अनुभव मला फार आहे. आज हिंदुस्थानामध्ये किंवा राज्यामध्ये ५६ वर्ष सतत निवडून येणारा कोण माझ्याशिवाय कोणतरी दाखवा आणि हे काम तुम्हीच चमत्कार केलात. त्या चमत्काराचा फायदा तुमच्या संसारात कसा होईल? त्याच्याकडेच लक्ष देणार त्याच्याशिवाय काही नाही आणि ते काम उद्याच्या विधानसभेत तुम्ही करायचं. असं आवाहन पवारांनी या ग्रामस्थांना केलं आहे.

follow us

वेब स्टोरीज