‘केंद्र सरकारने ज्ञानेश कुमारांबाबत लवकर निर्णय घ्यावा’; शरद पवारांचे इंडिया आघाडीच्या आंदोलनावरुन भाष्य!

Sharad Pawar on Gyanesh Kumar; दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Sharad Pawar on Gyanesh Kumar

Sharad Pawar on Gyanesh Kumar

Sharad Pawar on Gyanesh Kumar:दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केंद्र सरकारकडे केली आहे. केंद्र सरकारने याबाबत तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे, निर्णय घेतला नाही, त्यामुळे आज दिल्लीत विरोधी पक्ष एकत्र आलेत, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.  तसेच, सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि संजय राऊत (Sanjay Raut) हे आंदोलनात सहभागी होऊन आपली भूमिका मांडणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पवनचक्कीच्या वाहनांसाठी शेकडो झाडांचा बळी; नेकनूरमधील वृक्षतोडीने संताप

शरद पवार यांनी यावेळी आपली भूमिका स्पष्ट करताना राज्यातील दुष्काळी परिस्थितीकडेही लक्ष वेधले. सध्या आपले लक्ष राज्यातील पाणी, चारा आणि दुष्काळाच्या प्रश्नांवर असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे दिल्लीतील आंदोलनात सुप्रिया सुळे आणि संजय राऊत सहभागी झाले असले, तरी आपण महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

दिल्लीत इंडिया आघाडीची ‘वोट बचाव, देश बचाव’ महारॅली; राहुल गांधींच्या नेतृत्वात विरोधकांचा मोर्चा

दरम्यान, दिल्लीतील रामलीला मैदानावर इंडिया आघाडीकडून ‘वोट बचाव, देश बचाव’ महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेत कथित अनियमितता झाल्याचा आरोप करत विरोधकांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात काँग्रेससह इंडिया आघाडीतील विविध पक्षांचे नेते सहभागी झाले आहेत.

Exit mobile version