Sharad Pawar Meet Baba Adhav In Mahatma Phule Wada : पुण्यातील महात्मा फुले वाडा येथे ईव्हीएमविरोधात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव (Baba Adhav) यांचं आत्मक्लेष आंदोलन सुरु आहे. आज जेष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. यावेळी शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना निवडणुकीमध्ये सत्तेचा गैरवापर करण्यात आलाय. या निवडणुकीत पैशांचा महापूर आला होता, अशी लोकांमध्ये चर्चा असल्याचं देखील म्हटलंय.
शरद पवार म्हणाले की, राज्यामध्ये आणि देशात पैशांचा वापर करून विधानसभा निवडणूक (Maharashtra Politics) जिंकल्यामुळे लोकांमध्ये अस्वस्थता आगे. जे लोक संसद अन् संसदेच्या बाहेर भेटले त्यांना जयप्रकाश नारायण यांची आठवण झालीय. पाच लोकांमध्ये चर्चेचा सूर असून बाबा आढाव यांनी पुढाकार घेवून त्यांनी आत्मक्लेष आंदोलन सुरु केलंय. बाबा आढाव यांनी एकट्याने ही भूमिका घेणं योग्य नसल्याचं शरद पवारांनी म्हटलंय. लोकांनी देखील उठाव केला पाहिजे अन्यथा लोकशाही धोक्यात येईल, असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ‘भीमराया तुझ्यामुळे’द्वारे अभिवादन, माणूस घडण्याची गोष्ट
शरद पवार यांनी पुण्यातील फुले वाड्यात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांची आज भेट घेतली आहे. यावेळी शरद पवार आणि बाबा आढाव यांच्यामध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झालीय. विधानसभा निवडणुकीत ईव्हीएममध्ये घोटाळा झालाय. लोकशाहीचं वस्त्रहरण करण्यात आल्याचा आरोप बाबा आढाव यांनी केलाय. लोकसभा निवडणुकीत वेगळा अन् त्यानंतर लगेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत निकाल कसा वेगळा लागतो, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय.
CM पदासाठी भाजपाचं धक्कातंत्र? मुरलीधर मोहोळांच्या नावाची चर्चा, मोहोळांनीही क्लिअरच केलं..
या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी सतत बदलत गेली आहे. ईव्हीएम आणि पैशांच्या वापरामुळे असा निकाल आलाय. तीन दिवस आत्मक्लेष आंदोलन करणार असल्याचं बाबा आढाव यांनी सांगितलं आहे. त्यानंतर ते सरकार विरोधात सत्याग्रह देखील करणार आहेत. अदाणींविरोधात लोकसभेमध्ये बोलू दिलं जात नाही. मी इथे आत्मक्लेश आंदोलन करतोय. तसंच बाबा आढाव यांनी गौतम अदानींवर देखील कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केलीय. आज बाबा आढाव यांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारला विरोधक नकोच आहेत, असं वक्तव्य केलंय.