Download App

पवारांच्या खास शिलेदाराकडून सुजय विखेंचा लोकसभेतील प्लॅन रिपीट; फेरमतमोजणीसाठी मोजले लाखो रूपये

  • Written By: Last Updated:

NCP Candidate Prashant Jagtap paid to Election Commission : महाराष्ट्रात महायुतीला बहुमत मिळालं असून त्यांनी 200 पेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत.राज्यात नुकतेच विधानसभा निवडणुका (Maharashtra Politics) पार पडल्या असून निकाल देखील जाहीर झालाय. या निवडणुकीत कॉंग्रेसच्या दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. परंतु त्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. या निकालावरून विरोधी पक्षातील नेत्यांनी ईव्हीएम मशीनवर (EVM Issue) शंका उपस्थित केलीय. फेरमतमोजणीची मागणी केलीय. या निकालाला विरोध केला जातोय.

काँग्रेसचं फक्त चिन्ह पण पक्ष सोबत नाही; पक्ष नेतृत्वच बंटी शेळकेंच्या रडारवर

शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादीच्या हडपसर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी फेरमतमोजणीसाठी 12 लाख 74 हजार 400 रुपये निवडणूक आयोगाकडे (Election Commission) भरले आहेत. पवारांच्या खास शिलेदाराकडून सुजय विखेंचा लोकसभेतील प्लॅन रिपीट झालाय. फेरमतमोजणीसाठी लाखो रूपये मोजले असल्याचं समोर येतंय.

अण्णा हजारे झोपले…बाबा आढावांचे आत्मक्लेश आंदोलन, ईव्हीएम घोटाळ्याविरोधात संजय राऊत आक्रमक

नुकताच विधानसभा निवडणुकीचा निकाल आलाय. निकालात ईव्हीएमचा घोटाळा, ईव्हीएमसोबत झालेली छेडछाड आणि यासोबतच मशिनरीमध्ये तंत्रज्ञानाद्वारे केलेला बदल या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने दिलेल्या अधिकारांनुसार ईव्हीएम मशिन पुन्हा पाहण्याचा चेक करण्याचा देखील अधिकार उमेदवाराला असतो. त्या अनुषंगाने माझ्या मतदारसंघात पाचशे बूथ आहेत. त्यानुसार माझ्या वाट्याला 27 बुथ आले आहेत. मी 12 लाख 74 हजार 400 रुपये चलन निवडणूक आयोगाकडे भरले आहेत.

यातून झालेला घोटाळा नक्कीच बाहेर येईल, असा विश्वास देखील प्रशांत जगताप यांनी व्यक्त केलाय. सत्य जगासमोर येईल, इतर उमेदवारांना देखील याचा फायदा होईल, लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी आमचा लढा आहे. पर्दाफाश करण्यासाठी आमचा लढा आहे, असं देखील प्रशांत जगताप म्हणाले आहेत.

follow us