CM फडणवीस अन् राज ठाकरेंची गु्प्त बैठक, रोहित पवारांना मात्र वेगळीच भीती; म्हणाले, “राज ठाकरेंचं..”

Rohit Pawar on Jayant Patil : आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र (Raj Thackeray) येतील अशा चर्चा सुरू होत्या. यातच आज एक मोठी घडामोड घडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यात एक गुप्त बैठक झाली. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. […]

ROHIT PAWAR

ROHIT PAWAR

Rohit Pawar on Jayant Patil : आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र (Raj Thackeray) येतील अशा चर्चा सुरू होत्या. यातच आज एक मोठी घडामोड घडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यात एक गुप्त बैठक झाली. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र या भेटीने उद्धव आणि राज ठाकरे युती होण्याआधीच बारगळते की काय अशी शक्यता व्यक्त होत आहे. या सर्व घडामोडींवर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी भाष्य केलं आहे. यातून राज ठाकरेंचं नाव खराब होऊ शकतं असं मला वाटतं, त्यांनी काळजी घ्यावी अशी प्रतिक्रिया रोहित पवार  यांनी दिली.

आमदार रोहित पवार यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस भेट, उबाठा आणि मनसे संभाव्य युतीवर भाष्य केले. पवार पुढे म्हणाले, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील अशी चर्चा होती. त्यांच्या परिवारात कटुता होती. ही कटुता परिवाराच्या पातळीवरच संपेल अशी आमची अपेक्षा होती. तशीच चर्चा होत असताना जर राज ठाकरे भाजप नेत्यांच्या भेटी घेत असतील तर सामान्य माणसांच्या भावना ज्या त्यांच्या बाजूने झाल्या होत्या.

देवेंद्र फडणवीसांची ‘चाणक्य’ नीती, राज ठाकरे मोहरा अन् उद्धव ठाकरेंचा गेम?

राज ठाकरे जर भाजपबरोबर चर्चा करत असतील तर फक्त वातावरण तयार केलं गेलं आणि या वातावरणाचा फायदा मनसेने वाटाघाटी करण्यासाठी केला का असा प्रश्न आता निर्माण होऊ शकतो. त्यामुळे राज ठाकरेंसारख्या मोठ्या नेत्याचं नाव कुठेतरी खराब होऊ शकतं असं नागरिक म्हणून मला वाटतं. याबाबतीत त्यांनी काळजी घ्यावी असं मला वाटतं, असे रोहित पवार म्हणाले.

जयंत पाटील भावनिक झाले होते

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापनदिन (Sharad Pawar NCP) सोहळा पुण्यात आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याच्या सुरुवातीलाच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी (Jayant Patil) मला प्रदेशाध्यक्ष पदातून मुक्त करा. नव्या चेहऱ्यांना संधी द्या, अशी विनंती व्यासपीठावरुन केली. त्यांच्या या विनंतीनंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या. त्यांच्या या वक्तव्यावर रोहित पवार यांनी आज उत्तर दिलं.

जयंत पाटील हे कार्यक्रमाच्या दिवशी भावनिक झाले होते. योग्य जबाबदारी ते पाळत आहेत. भावनेच्या भरात त्यांनी वक्तव्य केले. सुप्रिया सुळे, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे हे सर्व मिळून पक्षाचा भावी विचार करतील. प्रदेशाध्यक्षांची जबाबदारी मला मिळावी यासाठी माझी इच्छा नाही. सर्वसामान्य कार्यकर्त्याला ही जबाबदारी मिळावी असे मला वाटते. सुप्रिया सुळे, जयंत पाटील हे बसून एक चांगला विचार करतील व एक सामान्य कुटुंबातील सामान्य माणसाला अनेक वर्ष पक्षाच्या हितासाठी काम करत आहे अशा व्यक्तीला संधी मिळावी अशी माझी इच्छा आहे.

“मला प्रदेशाध्यक्ष पदातून मुक्त करा”, जयंतरावांच्या विनंतीवर पवारांचं सोपं उत्तर, म्हणाले, आता..

Exit mobile version