Ncp : लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (Ncp Sharad Pawar Group) गटाला पिपाणी चिन्हामुळे मोठा फटका बसल्याचं दिसून आलं होतं. त्यावरुन शरद पवार गटाकडून पिपाणी चिन्हावर आक्षेप घेण्यात आला होता. अखेर निवडणूक आयोगाकडून पिपाणी चिन्ह गोठवण्यात आल्याची माहिती समोर आलीयं. त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाला फटका बसणार नसल्याचं बोललं जात आहे.
स्फोटाचा मोठा आवाज झाला अन् ; ट्रेन चालकाची आपबिती, पण गावकरी वेगळेच सांगतायत
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला तुतारी चिन्ह देण्यात आलं होतं. तर विरोधक नेत्यांनी तुतारी चिन्हाला पिपाणी दाखवून चांगलंच आव्हान देण्यात आलं होतं. आता निवडणूक आयोगाने पिपाणी चिन्ह गोठवल्याने पिपाणी वाजणं विरोधकांकडून बंद होणार असल्याचं बोललं जात आहे.
बैठकीला दांडी! नितीन देशमुखांनी तहसीलदार अन् कृषी अधिकाऱ्यांना कोंडूनच घेतलं
लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांकडून पिपाणी चिन्हामुळे पक्षाला मोठा फटका बसला असल्याचं स्पष्ट केलं होतं. लोकसभेला राष्ट्रवादीला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह देण्यात आलं होतं. तर काही अपक्ष उमेदवारांना पिपाणी चिन्ह देण्यात आलं होतं. त्यामुळे दोन्ही चिन्हांमधील फरक काही मतदारांना न समजल्याने शरद पवार गटाचा सातारा मतदारसंघात पराभव झाला असल्याचा दावा करण्यात आला होता.
मातंग समाजासाठी महत्वपूर्ण निर्णय; ‘बार्टी’च्या धर्तीवर ‘आर्टी’च्या स्थापनेस ग्रीन सिग्नल…
दरम्यान, राज्यातील काही ग्रामीण भागात तुतारी आणि पिपाणी चिन्हामधील फरक मतदारांना कळला नसल्याचं दिसून आलं होतं. त्यामुळेच बीड लोकसभा निवडणुकीत पिपाणी चिन्हावर अनेक मतदारांनी मतदान केल्याचा दावा केला जात होता. बीड लोकसभेत पिपाणी चिन्ह वंचितच्या उमेदवाराला मिळाल्याने वंचित उमेदवाला अधिक मिळाली असल्याचंही राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सांगण्यात आलं होतं.