मातंग समाजासाठी महत्वपूर्ण निर्णय; ‘बार्टी’च्या धर्तीवर ‘आर्टी’च्या स्थापनेस ग्रीन सिग्नल…

मातंग समाजासाठी महत्वपूर्ण निर्णय; ‘बार्टी’च्या धर्तीवर ‘आर्टी’च्या स्थापनेस ग्रीन सिग्नल…

Aannabhau sathe Reasearch & Traning (Aarti) : राज्य सरकारकडून मांतग समाजासाठी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलायं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टीच्या धर्तीवर आता आण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी)च्या (Aanabhau sathe Research & Traning Center) स्थापनेस राज्य सरकारने मान्यता दिलीयं. या संस्थेच्या माध्यमातून मातंग समाजातील युवक-युवतींना शैक्षणिक, रोजगार, व्यवसायासाठी संधी देण्यात येणार असल्याची माहिती समोर आलीयं.

अजितदादांना घरात स्थान पण पक्षात घ्यायचे की नाही हे कार्यकर्ते ठरवतील… : पवारांचे सूचक विधान

आण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) या संस्थेच्या माध्यमातून मातंग समाजासह मातंग, मिनिमादिग, दखनी-मांग, मांग-म्हशी, मदारी, गारूडी, राधेमांग, मांग-गारोडी, मांग-गारूडी, मादगी, मादिगा या समाजापर्यंत विविध योजना पोहोचवून समाजाचा स्तर उंचावण्याचा सरकारचा उद्देश आहे. यासाठीच आर्टीची स्थापना करण्यास मान्यता देण्यात आलीयं.

मागील अनेक वर्षांपासून मातंग समाजाकडून आरक्षणाच्या वर्गीकरणासोबतच बार्टीप्रमाणेच आर्टी संस्थेची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी सातत्याने केली जात होती. मागील वर्षीच मातंग समाजाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीला लहुजी वस्ताद साळवे आयोगाने मातंग समाजाच्या प्रगतीसाठी काही शिफारशी केल्या होत्या. या शिफारशींचा अहवाल बैठकीत सादर केल्यानंतर मातंग समाजाचे प्रश्न समन्वयाने कालबद्ध पद्धतीने सोडवण्यात यावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube