Sharad Pawar On Baramati by Election : काँग्रेस हा मोठा राजकीय पक्ष आहे. बारामतीत उमेदवार देण्याचा काँग्रेसला अधिकार आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्याचं कारण नाही. बिनविरोध बिनविरोध अशी मागणी करण्यात अर्थ नाही, समोर कोणी असलं तरी निवडणूक लढलं पाहिजे. लोकसभेला सुप्रिया सुळेंविरोधात हाच (सुनेत्रा पवार) उमेदवार होता, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) चे खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी मांडलीय.
नवी दिल्ली येथील पत्रकार परिषदेत राहुरी, बारामती विधानसभेच्या पोटनिवडणूक, दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर शरद पवार यांनी ठोस भूमिका मांडलीय. बारामतीत उमेदवार देण्याचा काँग्रेसचा निर्णय आहे. तो एक मोठा राजकीय पक्ष आहे. त्यांना अधिकार आहे. आज चर्चा करण्याचे कारण नाही. बिनविरोध द्या, बिनविरोध द्या, मागणीचे कारण नाही. लोकशाहीत तुम्हाला निवडणूक लढवायची असेल तर लढावी लागते. सुनेत्रा पवार यांच्याविरोधात आम्ही उमेदवार उभा केलेला नाही. मागच्या वेळी सुनेत्रा पवार व सुप्रिया सुळे यांच्यात निवडणूक झाली. सुप्रियाची चौथी निवडणूक होती, असे पवार म्हणाले.
सुनेत्रा पवारांचा थेट काँग्रेस नेत्यांना फोन; भुजबळांनी बारामतीतील सभेत सर्व सांगितलं
अजित पवार हे लोकांमध्ये सक्रीय होते. त्यांचे विकासकामात लक्ष होतं. त्यांच्याबद्ल मतदारसंघात आदर आहे. अजितदादांचे जाणे कुटुंबाला दु:ख आहे. कुटुंब प्रमुख म्हणून भूमिका मांडली आहे. ही माझी राजकीय भूमिका आहे. आम्हाला निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे. पण आपण लढणार नाही, असे शरद पवार म्हणाले. राहुरी विधानसभा निवडणुकीबाबत उमेदवार देण्याबाबत स्थानिक पातळीवर चर्चा झाली आहे. त्यानंतर गोविंद मोकाटे यांना उमेदवार दिल्याचे शरद पवारांनी स्पष्ट केलंय.
बॅनरवर माझा फोटो असणे चुकीचे, शरद पवारांनी फटकारले
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीतील आजच्या सभेत बॅनरवर शरद पवार यांचा फोटो लावण्यात आला होता. त्यावरून मात्र शरद पवारांनी फटकारले आहे. महायुतीच्या बॅनरवर माझा फोटो वापरणे चुकीचे असल्याचे पवार यांनी म्हटलंय.
