Download App

‘तेव्हा राजीनामा घेतला नसता तर भुजबळ तुरुंगात गेले असते’; शरद पवारांचा खुलासा

  • Written By: Last Updated:

Sharad Pawar on Chhagan Bhujbal : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची रविवारी बीड जिल्ह्यात सभा पार पडली. या बैठकीत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. 23 डिसेंबर 2003 रोजी तुम्ही माझ्या गृहमंत्री पदाचा राजीनामा घेतला. तेलगी बानवट स्टॅम्प घोटाळ्यात माझी काय चुक होती, असा सवाल करत तुमच्यावरही अनेक आरोप झाले होते. तेव्हा तुम्ही राजीनामा दिला नाही, असं म्हणत स्टॅम्प घोटाळ्यात नाहक बदनामी झाल्याचा रोष व्यक्त केला. यावर आता शरद पवारांनी (Sharad Pawar) प्रत्युत्तर दिलं. तेव्हा राजीनामा घेतला नसता तर भुजबळ तुरुंगात गेले असते, असा खुलासा पवारांनी केला.

आज मुंबईत नव नियुक्त जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी पवारांनी छगन भुजबळांकडून झालेल्या टीकेवर भाष्य केलं. ते म्हणाले, तेव्हा जर मी भुजबळांचा राजीनामा घेतला नसता तर भुजबळ तुरुंगात असते. त्यांना तरुंगात जाण्यापासून मी वाचलं. त्यामुळं त्यांनी यावर न बोललेचं बरं, असं पवार म्हणाले.

शरद पवारांनी अजित पवारांविषयी केलेल्या वक्तव्यामुळं कार्यकर्त्यामध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. त्यामुळं पवारांनी आज पुन्हा एकदा संभ्रम ठेऊ नका, अशी स्पष्टोक्ती दिली. ते म्हणाले, तुम्ही कोणताही सभ्रम ठेऊ नका. फक्त लढायला तयार राहा. अजित पवार गटाकडून माझ्यावर टीका होत असेल तर होऊ द्या. त्यांनी टीका करू द्या. तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. आपल्याला आपला पक्ष वाढवायचा आहे. तुम्ही पक्ष वाढीवर आणि संघटन मजबूत करण्यावर भर द्या, असा कानमंत्र पवारांनी कार्यकर्त्यांना दिला.

Aditya Raj Kapoor Graduate : शम्मी कपूरचा मुलगा 67 व्या वर्षी झाला पदवीधर! मास्टर्सचीही तयारी… 

अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंड केल्यानं राष्ट्रवादीत फूट पडली. अजित पवार उपमुख्यमंत्री झाले.त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या 9 ज्येष्ठ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर दोन्ही गटात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी बीडच्या सभेत भुजबळांनी शरद पवारांवर टीका केली. ते म्हणाले की, ‘तेलगी मुद्रांक प्रकरणात माझ्यावर आरोप झाल्यानंतर माझा राजीनामा घेण्यात आला, मग खैरनार यांनी आरोप केल्यानंतर आपण राजीनामा का दिला नाही, दादा कोंडके यांच्यासारखे दुहेरी विनोद करू नका.’, असं भुजबळ म्हणाले होते.

यावर जिंतेंद्र आव्हाड यांनी अदृश्य हातांनी सीबीआच्या चार्जशीटमधील नाव खोडली, असं सूचक ट्विट केलं होतं. तर आता पवारांनीही मीच भुजबळांना तुरुंगात जाण्यापासून वाचवलं, असं वक्तव्य केलं. त्यावर आता छगन भुजबळ काय उत्तर देणार हेच पाहणं महत्वांचं आहे.

 

Tags

follow us