Aditya Raj Kapoor Graduate : शम्मी कपूरचा मुलगा 67 व्या वर्षी झाला पदवीधर! मास्टर्सचीही तयारी…

Aditya Raj Kapoor Graduate : शम्मी कपूरचा मुलगा 67 व्या वर्षी झाला पदवीधर! मास्टर्सचीही तयारी…

Aditya Raj Kapoor Graduate : आपल्याकडं शिक्षण एका विशिष्ट वयातच पूर्ण करावं असं म्हणतात, मात्र आपली इच्छाशक्ती असेल शिक्षणाला वय कधीच आडवं येत नाही. शिक्षणाला वयाचं बंधन नसतं असंही अनेकांनी म्हटलं आहे. हेच शम्मी कपूर (Shammi Kapoor) यांचा मुलगा आदित्य राज कपूर (Aditya Raj Kapoor) यांनी सिद्ध करुन दाखवलं आहे. आदित्य राज कपूर यांनी वयाच्या 67 व्या वर्षी पदवी प्राप्त केली आहे.

भाजपच्या माजी खासदारावर शिंदे सरकारची मेहेरबानी; 13 कोटींच्या शुल्कमाफीसाठी बदलले नियम

आदित्य राज कपूर यांनी फिलॉसॉफीमध्ये पदवी घेतली आहे. आदित्य हे उद्योजक असून ते गोव्यामध्ये राहतात. त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, आपल्याला शिक्षणाचं महत्व खूप उशीरा समजले मग त्यांनी शिक्षण घेतले.

आदित्य राज कपूर यांनी वयाच्या 67 व्या वर्षी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून पदवी घेतली. त्यांनी 59.67 टक्के गुण मिळवून ही पदवी पूर्ण केली आहे. त्याचबरोबर आता त्यांना पुढचे शिक्षण घेऊन मास्टर्स डिग्रीही मिळवायची आहे. त्यांनी त्यासाठी प्रवेशही घेतला आहे.

कपूर घराणं तसं सिनेक्षेत्रात अग्रेसर आहे. मात्र शम्मी कपूर यांचा मुलगा आदित्य यांनी चित्रपटांमध्ये फारसा रस दाखवला नाही. आदित्य यांना निसर्गामध्ये फिरण्याची आवड आहे. त्याचबरोबर ते एक उत्साही बाईक रायडर आहेत.

आदित्य यांनी या वयात शिकण्याच्या इच्छेबद्दल सांगितले की, वयाच्या 16 व्या वर्षापासून त्यांनी आरके स्टुडिओमध्ये कमाई सुरू केली. पूर्वी आपल्याला अभ्यासासाठी संधी होती पण अभ्यास करण्याची इच्छा नव्हती, पण जेव्हा शिक्षणाचे महत्व समजले तेव्हा पुरेसे पैसे नव्हते.

त्यांनी सांगितले की, त्यांची मुलगी तुलसीने त्यांना पु्न्हा अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन दिले. आपल्याकडे पदवी नसल्याने आलेल्या अडचणींबद्दल सांगताना ते म्हणाले की, आपल्याकडे पदवी नसल्याने बँकेकडून कर्ज नाकारण्यात आले. मात्र आज आपल्याकडे पदवी आहे, हे अभिमानाने सांगू शकतो.

आदित्य यांनी सांगितले की, आपण जेव्हा चित्रपटसृष्टी सोडली तेव्हा नवीन नोकरी शोधायला सुरुवात केली, तेव्हा अनेकांनी आपल्याकडे पदवी नसल्याची मोठी खंत व्यक्त केली. नोकरीसाठी पदवीची मागणी केली.

आदित्य कपूर यांचे आजोबा पृथ्वी राज कपूर हे कॉलेजमध्ये गेले होते, त्यानंतर त्यांचे वडिल शम्मी कपूर यांनी कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षापर्यंत शिक्षण घेतले. पण आपल्या पिढीतील कोणीही कॉलेजमध्ये गेले नाही कारण प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त आहेत, बाकी काही का असेना पण आदित्य राज कपूर यांच्या शिक्षण घेण्याबद्दलची जी तळमळ पाहून असं वाटतं की, शिक्षणाला वयाचं कोणतंही बंधन नसतं…

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube