Download App

‘…तर आमची समन्वयाची भूमिका’; मराठा आरक्षणावर पवारांनी स्पष्ट केली भूमिका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) सर्वपक्षीय बैठक बोलवावी. आमची समन्वयाची भूमिका राहिल, असं पवार म्हणाले.

  • Written By: Last Updated:

Sharad Pawar : गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा पेटला आहे. काल मराठा आंदोलकांनी शरद पवारांचा (Sharad Pawar) ताफा अडवला. त्यानंतर आता शरद पवारांनी आपली भूमिका जाहीर केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) सर्वपक्षीय बैठक बोलवावी. आमची समन्वयाची भूमिका राहिल, असं पवार म्हणाले.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत किती झाली नोंदणी’? मंत्री अदिती तटकरेंनी दिली आकडेवारी 

शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. मराठा आरक्षणाबाबत बोलताना ते म्हणाले की, आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी पर्याय काय आहेत? यावर माझी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षीय बैठक बोलवावी. त्यांना योग्य वाटतं त्या नेत्यांना बोलवावं. या बैठकीला विरोधी पक्षाच्या वतीने आम्ही हजर राहू. सर्वपक्षीय बैठकीला मनोज जरांगे यांनाही निमंत्रित करावं. याशिवाय, ओबीसींच नेतृत्व करणारे छगन भुजबळ यांनाही निमंत्रीत करावं. त्या संयुक्त बैठकीत चर्चा करून आरक्षणाचा तिढा कसा सोडता येईल ते पाहावं, असं शरद पवार म्हणाले.

Bigg Boss Marathi: घरात आलेल्या दोन छोटे पाहुण्यांमुळे, निक्कीचं ‘बाई’ झालं ‘आई’ 

पुढं ते म्हणाले की, 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देता येत नाहीत, असा केंद्र सरकारचा निर्णय आहे. तामिळनाडूमध्ये सुमारे 73 टक्के आरक्षण देण्यात आलं होतं. तो निर्णय न्यायालयात टिकला होता. त्यानंतर कोर्टाने जे निकाल दिले ते तामिळनाडूसारखे नाही. याचा अर्थ धोरण बदललं पाहिजे, असं पवार म्हणाले.

मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार मोदी सरकारच्या हातात आहे. सरकारने 50 टक्यांवरील आरक्षणाचं धोरण बदललं पाहिजे. जर सरकारने ही भूमिका घ्यावी. 50 टक्यांवरील आरक्षणाचं धोरण बदललं तर आम्ही मोदी सरकारला जे हवं ते सहकार्य करायला तयार आहोत. आमची समन्वयाची भूमिका राहील, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

जरांगे यांनी मराठा आरक्षणाबरोबरच धनगर, मुस्मिम, लिंगायत आरक्षणाची भुमिका मांडली आहे. ही चांगली बाब असल्याचं पवार म्हणाले.

Bigg Boss Marathi: घरात आलेल्या दोन छोटे पाहुण्यांमुळे, निक्कीचं ‘बाई’ झालं ‘आई’ 

राज ठाकरेंनी शरद पवारांवर जोरदार टीका केली होती. जातीबद्दल द्वेष निर्माण करणं हे पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना केली तेव्हापासून सुरू झालं. ते जरांगे पाटलांच्या आडून राजकारण करतात. माझ्या नादी लागू नका, असा इशारा त्यांनी दिला होता. त्यावर बोलताना पवार म्हणाले, राज ठाकरे यांनी माझे नाव दोन तीन वेळा का घेतले? हे मला माहीत नाही. मी या मार्गाने जात नाही. माझी तसा इतिहास नाही,असं पवार म्हणाले.

पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री पदाबाबत मांडलेली भुमिका दुर्लक्ष करण्याजोगी नाही. ज्याच्या जास्त जागा येतील, त्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो, असं पवार म्हणाले.

follow us