Download App

श्रीगोंद्याच्या जागेवरून मविआत खटके! परस्पर उमेदवार जाहीर केल्यानं पवारांनी संजय राऊतांना सुनावलं

उमेदवारी जाहीर करण्याचा अधिकार कुणालाही नाही, महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष मिळून उमेदवार ठरवतील - शरद पवार

  • Written By: Last Updated:

Sharad Pawar : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Elction) सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुतीमध्ये (Mahayuti) जागावाटपाच्या चर्चा सुरू आहेत. मविआत काही जागांवरून मतभेद असल्याचं दिसून येतं. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी श्रीगोंदा विधानसभ़ा (Shrigonda Vidhansabha) मतदारसंघावर दावा ठोकला. त्यावरून महाविकास आघाडीत खटके उडाले. राऊतांनी परस्पर उमेदवारी जाहीर केल्यानं शरद पवारांनी (Sharad Pawar) त्यांना चांगलंच फटकारलं.

… तर थिएटर मालकांनो महागात पडेल, पाकिस्तानी चित्रपटावरून राज ठाकरेंचा इशारा 

नगरमधील श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघावर ठाकरे गटाने दावा ठोकला. संजय राऊत यांची श्रीगोंद्यात सभा झाली. त्यात त्यांनी श्रीगोंद्यातील पुढचा आमदार ठाकरे गटाचाच असेल, असं विधान केलं. त्यावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, शिवसेनेचे एक नेते काल तुमच्या तालुक्यात आले होते. तसेच त्यांनी हे आमचे उमेदवार आहेत, असं जाहीर करून टाकलं. अशाप्रकारे उमेदवारी जाहीर करण्याचा अधिकार कुणालाही नाही, महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष मिळून उमेदवार ठरवतील, असं पवारांनी स्पष्ट केलं.

Spruha Joshi : हातात पुस्तक अन् निळी साडी, स्पृहाचा मनमोहक लूक 

तर यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही प्रतिक्रिया दिली. कोणताही निर्णय न होता परस्पर उमेदवार जाहीर करणे चुकीचे आहे. पवार साहेब म्हणतात ते बरोबर आहे. कारण जेव्हा तिन्ही पक्षाचा निर्णय होईल, तेव्हाच उमेदवार जाहीर केले पाहिजेत, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं.

राऊतांकडून सारवासारव…
दरम्यान, शरद पवार यांनी कानउघाडणी केल्यानंतर संजय राऊत यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. शरद पवार यांच्याकडे श्रीगोंद्याबाबत चुकीची माहिती आहे. प्रत्येक पक्ष आपापल्या उमेदवारांना काम करण्यासाठी संदेश देत असतो, मी देखील तेच केलं, असं राऊतांनी म्हटलं.

श्रीगोंद्यात काय घडतं माहीत नाही. पण, महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी होणार आहे. कोणीही कोणती तयारी केली नाही. पण आम्ही कार्यकर्त्यांना तयारी लागा, कामाला लागा असा संदेश दिला तर त्यात चुकीचं काय?, असं राऊत म्हणाले.

follow us