Sharad Pawar On Shiv Sena MLAs disqualification : गेल्या 8 ते 10 महिन्यांपासून राज्यात चर्चेत असलेल्या शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर (Shiv Sena MLAs disqualification) आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) निकाल जाहीर केला. नार्वेकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदार पात्र ठरवलेत. तसंच शिवसेना (Shivsena) ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीच आहे, यावर शिक्कामोर्तब केलं. या निर्णयावर आता संमिश्र प्रतिक्रिया आहेत. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी हा निकाल म्हणजे, न्यायालयीन निवडा नसून राजकीय निवाडा असल्याची टीका केली.
दोन्ही गटाचे आमदार पात्र, आता कोणाचा व्हीप लागू होणार? काय म्हणतात कायदेतज्ज्ञ…
नार्वेकरांनी निकाला दिल्यानंतर शरद पवारांनी पत्रकार परिषदे घेतली. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, आजचा निर्णय हा उद्धव ठाकरेंना अनुकूल असेल असं वाटत नव्हतं आणि झालंही तसं. ठाकरेंच्या विरोधात निकाल लागला हे आश्चर्यकारक आहे. त्यामुळं त्यांना सुप्रीम कोर्टात जावं लागले. सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी अगदी मुख्यमंत्र्यांनी देखील अनेक ठिकाणी या निकालाच्या आधीच निकाल काय लागेल, याविषयी भाष्यं केलं. निकालाविषयी ते ज्या ठामपणे बोलते होते, याचा अर्थ त्यांना निकालाची कल्पना होती, असं पवार म्हणालेय
बाळासाहेब ठाकरेंनी उद्धव ठाकरेंकडे शिवसेना सोपवली होती. मात्र, आजच्या निकालाने शिवसेना शिंदेकडे गेली. विधानसभा अध्यक्षांनी विधीमंडळ पक्षाला महत्व दिलं. तर पक्ष संघटना मोठी आहे, हे सुप्रीम कोर्टाने सुभाष देसाईंच्या प्रकरणात म्हटलं होतं. शिवाय, व्हीप देण्याचा अधिकार हा पक्ष संघटनेला आहे. आणि शिंदेंनी व्हीप मोडला म्हणून कारवाई करावी, असं सांगितलं होतं. मात्र, विधानसभा अध्यक्षांना विधीमंडळ पक्षाला महत्व दिलं. त्यामुळं सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन डावलल्या गेल्या. आजचा निकाला हा न्यायालयीन निवाडा नाही, तर राजकीय निवाडा आहे, अशी टीका पवारांनी केली.
आज सकाळपासून दोन्ही गटांचे आमदार निर्णयाची वाट पाहत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने हा निर्णय आपल्या बाजूने लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली होती, तर उद्धव ठाकरे गटानेही हा निर्णय आपल्या हिताचा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र, या निर्णयामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. आता उद्धव ठाकरे गटाकडूनही प्रतिक्रिया येत आहेत. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत विधानसभा अध्यक्षांवर हल्लाबोल केला. मूळ राजकीय पक्षाबाबत विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय म्हणजे निर्लज्जपणाची पराकाष्ठा आहे, तो लोकशाहीचा खून करणारा आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.