दोन्ही गटाचे आमदार पात्र, आता कोणाचा व्हीप लागू होणार? काय म्हणतात कायदेतज्ज्ञ…

दोन्ही गटाचे आमदार पात्र, आता कोणाचा व्हीप लागू होणार? काय म्हणतात कायदेतज्ज्ञ…

MLA Disqualification : विधानसभा अध्यक्षांनी खरी शिवसेना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचीच हे सांगताना भरत गोगावले (Bharat Gogawale) यांचा व्हीप वैध असल्याचं सांगितलं. आमदार अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी ऐतिहासिक निरीक्षणं नोंदवली आहेत. दोन्ही गटाचे आमदार विधानसभा अध्यक्षांनी पात्र ठरवले आहेत. त्यामुळे कोणाचा व्हीप लागू होणार याची सर्वत्र चर्चा आहे. ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उमेशचंद्र यादव यांनी दोन्ही गट स्वतंत्र पक्ष असून उद्धव ठाकरेंना आता नवीन घटना तयार करावी लागणार असल्याचे सांगितले.

2018 मध्ये उद्धव ठाकरेंची पक्ष प्रमुख म्हणून झालेली निवड अयोग्य असल्याचंही नार्वेकर यांनी सांगितले. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालात भारत गोगावले यांचा व्हीप अवैध ठरवला होता. 2018 मध्ये उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून झालेली निवड अयोग्य आहे. 1999 च्या घटनेनुसार उद्धव ठाकरेंना कोणालाही पदावरुन हटवण्याचा अधिकार नाही. त्यामुळे पक्ष नेतृत्वाचं मत हे पक्षाचं मत असं गृहित धरता येत नाही. त्यामुळे एकनाथ शिंदेंना हटवण्याचा निर्णय उद्धव ठाकरे घेऊ शकत नाहीत, असे राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले.

भरत गोगावलेंचा व्हीप वैध
बंडखोरी झाली तेव्हा एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना खरी शिवसेना होती. त्यामुळे भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून झालेली निवड ही वैध ठरते. 21 जून 2022 रोजी विधीमंडळ सचिवालयाकडे असलेल्या नोंदीनुसार शिंदे गटाकडे बहुत दिसून आले. त्यामुळे शिंदे गट हा त्या दिवशी खरा शिवसेना पक्ष आहे, असे राहुल नार्वेकर यांनी सांगितले.

MLA disqualification : आमदार अपात्रता प्रकरणावर नार्वेकर काय म्हणाले? पाच मुद्यांतून जाणून घ्या निकाल

सुनील प्रभूंचा व्हीप लागू नाही
आमदार सुनील प्रभूंना ती बैठक बोलावण्याचा कोणताही अधिकार नव्हता. त्यामुळे त्या बैठकीतील गैरहजेरी ही ग्राह्य धरता येणार नाही, असे निरीक्षण अध्यक्षांनी नोंदवलं आहे. शिंदे गटाच्या नेत्यांनी तो व्हीप मिळालाच नसल्याचं आधीच स्पष्ट केलं आहे. सुनील प्रभू यांनी तो व्हीप व्हॉट्सअॅपवर पाठवला होत, त्यामुळे तो सर्वांना मिळाल्याचे कोणतेही पुरावे त्यांच्याकडे उपलब्ध नव्हते, असेही अध्यक्ष म्हणाले.

शिंदेंच्या निकालाने अजितदादांचे टेन्शन घालविले? राहुल नार्वेकर याच महिन्यात घेणार राष्ट्रवादीचाही निर्णय

एकमेकांना व्हीप लागू होणार नाही
आजच्या तारखेला उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळ पक्ष व राजकीय पक्ष दोन्ही गमावले आहे. विधिमंडळ कामकाज प्रतोदमार्फत चालते. विधिमंडळ पक्षाची मालकी व राजकीय पक्षाची मालकी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. आता एकमेकांना दुसऱ्याचा व्हीप लागू शकत नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला स्वतःची घटना बनवून पक्ष चालवावा लागणार आहे. दोन्ही गटाचा व्हीप व पक्ष आता वेगळा आहे, असे कायदेतज्ज्ञ उमेशचंद्र यादव यांनी सांगितले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube