शिंदेंच्या निकालाने अजितदादांचे टेन्शन घालविले? नार्वेकर याच महिन्यात घेणार राष्ट्रवादीचाही निर्णय

शिंदेंच्या निकालाने अजितदादांचे टेन्शन घालविले? नार्वेकर याच महिन्यात घेणार राष्ट्रवादीचाही निर्णय

मुंबई : मुख्यमंत्री एकनााथ शिंदे यांचीच शिवसेना खरी असल्याचा आणि त्यांच्यासह 16 आमदार पात्र असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज (10 जानेवारी) रोजी दिला. त्यानंतर आता राज्यभरात शिंदेंच्या गटाने आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. दरम्यान, या निकालानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही टेन्शन गेले असल्याचे बोलले जात आहे. (Ajit Pawar is also relieved after Assembly Speaker Rahul Narvekar gave the verdict in favor of Chief Minister Eknath Shinde.)

गतवर्षी 2 जुलै रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही एकनाथ शिंदे यांच्याच पावलावर पाऊल ठेवत राष्ट्रवादीमध्ये बंड केले. त्यानंतर त्यांच्यासह नऊ आमदारांनी शिंदे सरकारमध्ये मंत्री म्हणूनही शपथ घेतली. त्यामुळे त्यांच्याविरोधातही राष्ट्रवादी (शरद पवार) गटाकडून अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार येत्या 31 जानेवारीपर्यंत या याचिकांवर निकाल देणे बंधनकारक आहे. आता एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदार पात्र ठरल्यानंतर अजित पवार यांच्यासह नऊ आमदारही काहीसे निर्धास्त झाल्याचे म्हणावे लागेल.

खरी शिवसेनाही एकनाथ शिंदे यांचीच!

शिवसेना आमदार अपात्रता याचिकेवर निकाल देताना नार्वेकर यांनी खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचाच गट असल्यावरही शिक्कामोर्तब केले. शिवसेनेची घटना, पक्ष संघटना आणि बहुमत या गोष्टींचा आधार घेत खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच असल्याचा निर्णय त्यांनी दिला.

निकाल वाचनाला सुरुवात केल्यानंतर नार्वेकर म्हणाले, दोन्ही गटांनी पक्षाच्या वेगवेगळ्या घटना दिल्या होत्या. उद्धव ठाकरेंनी दिलेल्या घटनेवर तारखेचा उल्लेख नव्हता. त्यामुळे निवडणूक आयोगाने दिलेली घटना ग्राह्य धरण्यात आली. यावर देखील तारीख नव्हती. निवडणूक आयोगाकडे 1999 सालच्या घटनेची प्रत होती.

त्यामुळे 2018 साली करण्यात आलेले बदल ग्राह्य धरण्यात आले नाहीत. तर उलट तपासणीसाठी न आल्यामुळे ठाकरे गटाचं प्रमाणपत्र अमान्य आहे. असेही निरीक्षण नोंदवत त्यांनी पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची झालेली नियुक्ती फेटाळून लावली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज