Download App

कुटुंबाला सांगूनच पवारांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा

  • Written By: Last Updated:


प्रफुल्ल साळुंखे : विशेष प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या लोक माझा सांगाती या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा केली. पवारांच्या अचानक या घोषणेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये खळबळ उडाली. पवार यांनी हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांसह दुसऱ्या फळीतील नेते, युवक कार्यकर्त्यांनी केली आहे. पवारांचा या निर्णयाने राज्याच्या राजकारणाबरोबर देशातील राजकारणामध्ये खळबळ उडाली.

Sharad Pawar Retirement : अजितदादांचा वेगळा सूर; अनिल देशमुखांनी बोलणंच टाळलं

शरद पवार यांच्या निर्णयाची कल्पना नव्हती, असे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी सांगितले. पवारांच्या या निर्णयाने अनेक नेत्यांना रडू कोसळले. सभागृहात गोंधळ सुरू असताना विरोधी पक्षनेते अजित पवार हे सर्वांना शांत करत होते. त्याचवेळी अजित पवार यांनी शरद पवारांचा निर्णय माहिती असल्याचे जाहीर करून टाकले. शरद पवार यांची राजकीय कारकीर्द ही १ मे १९६६ ला सुरू झाली होती. याच एक मेच्या दिवशी म्हणजे काल त्यांना निवृत्तीची घोषणा करायची होती. पण महाविकास आघाडीची सभा असल्याने ती एक दिवस पुढे ढकलण्यात आली असल्याचे अजित पवार यांनी सांगून टाकले.

Sharad Pawar Retirement : सुप्रिया की, अजित पवार; NCP चा पुढचा अध्यक्ष कोण?, पवारांनी खुर्ची का सोडली?

म्हणजेच जी गोष्ट कुणालाही माहीत नव्हती. ती बाब अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांना माहीत होती हे नक्की झाले आहे.
अजित पवार यांनी सांगिल्याप्रमाणे हा निर्णय आधी ठरला होता. तर मग तो पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन केला का? मग समिती नेमण्याचा निर्णय झाला होता का ? या विषयाच्या अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहे. संध्याकाळी पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी यांची बैठक होणार आहे. या बैठकीत पुढील रणनिती ठरणार आहे. मग अशा वेळी अजित पवार आणि सुप्रिय सुळे याना झुकत माप मिळेल का ? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

Tags

follow us