Download App

‘आपण जीवाभावाची माणसं, पवारसाहेबांच्या अनुभवाचा फायदा घ्यायला काय हरकत दादा?’

Eknath Shinde on Sharad Pawar : राज्यातील सर्वसामान्य माणसाला फायदा होईल असं आपण काम केलं पाहिजे. हाच सरकारचा हेतू आहे. शरद पवार (Sharad Pawar) देखील कधी कधी फोन करतात. त्यांच्या अनुभवाचा फायदा घ्यायला काय हरकत आहे चंद्रकांत दादा? बरोबर ना? असे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्याकडे बघत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले. मराठा मंदिराच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमाच्या सांगता सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते.

ठाण्यातील एका कार्यक्रमाचा दाखला देताना मुख्यमंत्री म्हणाले की आपण बोलल्यानंतर कटूता राहात नसते मार्ग निघत असतो. निवडणूका राजकारणापुरत्या असतात, तोपर्यंत ठिकय. पण निवडणूका झाल्यानंतर कायमच राजकीय अखाडे तयार केले पाहिजेत असे नाही. शेवटी आपण जीवाभावाची माणसं आहेत, असे कौतुक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

सोज्वळपणा सोडा! ठाकरे-फडणवीस वादात बावनकुळेंनी दोन शब्दांत ओतलं तेल

शरद पवार यांनी राजकारणापलिकडचे मित्र जोडले आहेत. राजकारणात ठीकय, सगळ्या गोष्टी असतात. मी आता मुख्यमंत्री आहे. माझा पक्ष वेगळा आहे. त्यांचा पक्ष वेगळा आहे. मला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समाजाचा किंवा राज्याचा एखादा विषय असेल तर पवारसाहेब अवर्जून फोन करतात. अपण असं केलं तर असा मार्ग निघू शकतो याचं मार्गदर्शन करतात. त्यांचा उद्देश असतो की राज्याला फायदा झाला पाहिजे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

विठ्ठलाच्या मदतीला एकनाथ धावला! CM शिंदेंच्या संवेदनशीलपणाने सातारकर भारवले

शिक्षण क्षेत्राच्या वाटचालीत मराठा मंदिराचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे. आता पवारसाहेब अध्यक्ष आहेत त्यामुळे काही चिंताच नाही. पवारसाहेब फक्त राजकीय नेतेचं नाहीत त्यांनी अनेक संस्था उभा केल्या आहेत. सामाजिक, शैक्षणिक, सहकार अनेक क्षेत्रात त्यांचे योगदान आहे. अशा कामाचा त्यांच्याकडे मोठा अनुभव आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

Tags

follow us