सोज्वळपणा सोडा! ठाकरे-फडणवीस वादात बावनकुळेंनी दोन शब्दांत ओतलं तेल

सोज्वळपणा सोडा! ठाकरे-फडणवीस वादात बावनकुळेंनी दोन शब्दांत ओतलं तेल

Chandrasekhar Bawankule : ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून येत आहे. हे दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आजही उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर जोरदार फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी फडणवीस यांना कुटुंबावरून डिवचण्याचा प्रयत्न केला. जर कुटुंबावर आलात शवासन करावं लागेल, हे लक्षात ठेवा, असा इशारा त्यांनी दिला. दरम्यान, ठाकरेंच्या टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी जोरदार प्रत्युत्तर देत फडणवीसांनी सोज्वलपणा सोडावा, अशी विनंती केली. (Nothing will be tolerated about Fadnavis; Chandrasekhar Bawankule’s warning to Uddhav Thackeray)

आज प्रसारमाध्यमांशी बोलतांना बावनकुळे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल काहीही बोललेलं आम्ही खपवून घेणार नाही, हे राज्य खपवून घेणार नाही. आज राज्यातील जनतेनं देवेंद्र फडणवीस यांना मान्यता दिली. त्यांचं नेतृत्व मान्य केलेलं आहे. त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल काहीही बोललेलं आम्हाला मान्य नाही. आता आम्हाला फडणवीसांना विनंती करावी लागेल की, आता तुमचा सोज्वळपणा सोडा, तुमचे जे संस्कार आहेत, ते तुम्हाला सोडावे लागतील. कारण खाजगी आयुष्यावर, कुटुंबावर टीका करण्याचा अधिकार कोणालाही नाही.

गरीब वृध्द दाम्पत्याला मुख्यमंत्र्याचा मदतीचा हात, अन्यत्र पुनर्वसन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना दिले आदेश 

ते म्हणाले, व्यक्ती स्वातंत्र्यावर बोलण्याचा अधिकार कोणालाही नाही. मात्र असा प्रयत्न कुणी पुन्हा पुन्हा करत असेल तर तो प्रयत्न आम्हाला हाणून पाडावा लागेल, असा इशाराही बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारला शह देण्यासाठी देशातील प्रमुख विरोधी पक्ष एकत्र आलेत. काल त्यांची संयुक्त बैठक पाटणा येथे झाली. या बैठकीत उद्धव ठाकरेंनीही हजेरी लावली होती. बैठकीदरम्यान पीडीपी अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती ठाकरे यांच्या शेजारी बसलेल्या दिसल्या. यावरून फडणणीस यांनी ठाकरे यांच्यावर टीका केली होती. उद्धव ठाकरे हे सत्तेसाठी आणि कुटुंबाला वाचवण्यासाठी मुफ्तींच्या बाजुला जाऊन बसले.

त्यांच्या याच टीकेला प्रत्युत्तर देताना ठाकरेंनी फडणवीसांवर सुनावले की, देवेंद्रजी, इतक्या खालच्या पातळीवर येऊन टीका करू नका. आमच्या कुटुंबाबद्दल बोलाल तर तुमचंही एक कुटुंब आहे. आम्ही अजून तुमच्या कुटुंबाबद्दल बोललो नाही. लक्षात घ्या की आमच्याकडे व्हॉट्सअॅप चॅट्स आहेत. जर कुटुंबावर आलातर तर शवासन करावं लागेल, हे लक्षात ठेवा, असा इशारा दिला होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube