Sharad Pawar At Thane Tulja Bhavani Temple Inauguration : ठाण्यात प्रति तुळजापूर मंदीर (Tulja Bhavani Temple) साकारलं गेलं आहे. यावेळी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी शरद पवार यांनी म्हटलंय की, अभिमान वाटावा असा हा सोहळा आहे. आजचा दिवस अक्षय तृतीयेचा आहे. सगळ्यात उत्तम मुहुर्त असतो, तो अक्षय तृतीयेचा असतो. अक्षय तृतीयेच्या दिवशी आज सकाळी ठाण्यात जितेंद्र आव्हाड (Jitendra Avhad) आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीत आजचा सोहळा याठिकाणी आयोजित केला होता.
तुळजापूर मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी (Thane) केली आहे. क्वचितच ती इतरत्र बघायला मिळेल. माझी खात्री आहे, इथे जी व्यक्ती येईल. तिला दर्शन घेतल्यानंतर त्यांना नक्की समाधान लाभेल. मला आनंद आहे. काही लोक म्हणतात, मी अशा कार्यक्रमाला जात नाही. परंतु हे अर्ध सत्य आहे. पण मी राज्याचा प्रमुख असताना चार ते पाच वेळेला पूजा केलेली होती.
VIDEO : मनोज जरांगे पुन्हा अॅक्टिव्ह; उपोषणाची तारीख ठरली, मुंबई पुन्हा चक्काजाम
त्यामुळे आपल्या या संदर्भांचं प्रदर्शन करू नये. पण भावनेने आणि श्रद्धेने आज मी, माझी पत्नी अन् आमचे सगळे सहकारी येथे उपस्थित आहोत. आमच्या सगळ्यांच्या व्यक्तिगत जीवनाचा हा आनंदाचा क्षण आहे, असं शरद पवारांनी आज बोलताना सांगितलं आहे. आपण या पवित्र प्रांगणात आहोत. या पवित्र प्रांगणात राजकारण आणू नका. कुटुंब एकत्र येत असेल तर आनंदच आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेवर दिली आहे.
VIDEO : सामना संपताच … कुलदीप यादवने मैदानातच रिंकू सिंगच्या कानशिलात लगावली, व्हायरल
जे पहलगाम झालं, ते माझ्या मते देशावरचा हल्ला आहे. त्या कुटुंबाचे व्यक्ती देशासाठी शहीद झाले आहेत. त्यांनी देशासाठी बलिदान दिलंय. त्यामुळे धर्म, जात, पात, भाषा आणायच्या नाही. देशाला एकत्र राहावं लागेल, असं देखील शरद पवार म्हणाले आहेत.