…तर एकाही आमदाराला घराच्या बाहेर फिरु देणार नाही; फडणवीसांचं नाव घेत उघड धमकी

…तर एकाही आमदाराला घराच्या बाहेर फिरु देणार नाही; फडणवीसांचं नाव घेत उघड धमकी

Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरुन मागील अनेक दिवसांपासून राज्यात आंदोलन सुरु असल्याचं चित्र आहे. अनेकदा आंदोलने, उपोषणे झाली, मात्र ही आंदोलने स्थगित करण्यात सरकारला प्रत्येकवेळी यश आलं. आता पुन्हा एकदा मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांचा ताफा मुंबईकडे रवाना होणार असून येत्या 28 ऑगस्टला जरांगे मुंबईत उपोषण करणार आहेत. मनोज जरांगे यांच्या ताफ्यातील एकाही पोराला धक्का लागला तर तुमच्या एकाही आमदाराला घराच्या बाहेर पडून देणार नसल्याची धमकीच मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना दिलीयं. ते अंतरवली सराटीतून पत्रकार परिषदेत बोलत होते.

धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय राजेंद्र घनवट यांच्या जमिनींची चौकशी; SIT स्थापन, अंजली दमानियांच्या मागणीची दखल

पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले, मी मुंबईला सोबत जाताना दोन रथ सोबत घेऊन जाणार आहे. एक विजयाचा रथ आणि एक अंत्य अंतिम यात्रेचा रंथ असणार आहे. या यात्रेदरम्यान, मराठा समाजाच्या एकाही पोराला धक्का लागल्यास महाराष्ट्रातला एकाही आमदार, खासदाराला घराच्या बाहेर फिरु देणार नाही, अशी थेट धमकीच मनोज जरांगे यांनी सरकारला दिलीयं.

फडणीससाहेब गर्वात वागू नका…
सार्थीमार्फत पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अजूनही शिष्यवृत्ती भेटली नाही. सत्ता जात असती देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही जास्त गर्वात वागू नका. नोंदी सापडलेले प्रमाणपत्र तातडीने द्यायला सुरुवात करा. 58 लाख प्रमाणपत्राच्या व्हॅलिडीटी तात्काळ देण्यात यावा. आमचा हक्क आम्हाला देण्यात यावा आमचा हक्क रोखू नका, असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.

अमायरा म्हणजे महाराष्ट्राने खूप काय दिलं त्याची परतफेड; सुभाष घईंनी व्यक्त केली कृतज्ञता

तसेच तुम्हाला ही सत्ता मराठ्यांनी दिली आहे. नेत्यांचं ऐकून जातीवाद हा शिक्षणात आणू नका. सग्या सोयऱ्यांची अंमलबजावणी तात्काळ करावी. तुम्ही आमचा हक्क नाकारू नका. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी 58 लाख पुरावे सापडले आहेत.मी मॅनेज होणारातला नाही. मराठा समाजबांधवांचा मी एकनिष्ठ असल्याचं मनोज जरांगे यांनी यावेळी स्पष्ट केलंय.

दरम्यान, आता कुठल्याही प्रकारे माघार घेणार नाही. सरकारकडे आता कारणच नाही मराठा समाजाने काय करायचं आता हे एक ऑगस्टला आपण सांगणार आहे. 28 ऑगस्टला मुंबईमध्ये उपोषण करणार असून मराठा कुणबी एकच हा अध्यादेश अद्याप काढलेला नाही मागणीवर आम्ही ठाम आहोत. कायदा पारित करायचा असेल तर आम्हाला वेळ देण्याची मागणी गिरीश महाजनांनी केली होती, त्यानंतर आम्ही वेळ दिला. कायद्याला आधार लागतो असं महाजन म्हणत होते, 58 लाख नोंदी सापडल्या आहेत हे पुरावे ह खूप झाले आहेत आधारासाठी, असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube