Download App

संभाजी भिडेंसारखी माणसं प्रतिक्रिया देण्याच्या लायकीची आहेत का?, शरद पवार संतापले

Sharad Pawar : संभाजी भिडे वगैरे काय प्रतिक्रिया देण्याच्या लायकीची माणसं आहेत का? काहीही प्रश्न विचारता का? - शरद पवार

  • Written By: Last Updated:

Sharad Pawar on Sambhaji Bhide : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा पेटला. मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी अनेकदा आंदोलने केली, मात्र अद्याप आरक्षणाचा तिढा सुटला नाही. दरम्यान, काल शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडेंनी (Sambhaji Bhide) मराठा आरक्षणबाबत मोठं वक्तव्य केलं. मराठ्यांना (Maratha) उभा देश चालवायचाय, आरक्षण कुठं घेऊन बसला? असं वक्तव्य केलं. यावर शरद पवारांना (Sharad Pawar) विचारले असता त्यांनी संतप्त होत भिडेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आणि पत्रकारांनाच झापले.

Ground Zero : इस्लामपूरमध्ये महायुतीत खळखळ… यंदाही जयंत पाटीलच आमदार? 

आज शरद पवार पुण्यात असतांना त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. अजित पवार यांनी बारामतीतून निवडणूक लढवण्यात रस नसल्याची भूमिका मांडली. त्याविषयी विचारलं असता पवार म्हणाले, प्रत्येकाला निर्णय घेण्याचा अधिकार असतो, त्यांना जिथं अनुकूल वातावरण असेल तिथे ते लढतील, पण त्यांच्या मनात नक्की काय आहे हे माहिती नाही, असं पवार म्हणाले.

Ground Zero : शिवाजीराव कर्डिलेंसाठी अजितदादांची फिल्डिंग… तनपुरेंची ‘विकेट’ पडणार? 

मराठा आरक्षणाबाबत संभाजी भिडेंनी मांडलेल्या भूमिकेविषयी विचारले असता पवारांनी त्यावर बोलण्यास नकार दिला. संभाजी भिडेंच्या वक्तव्याविषयी विचारत असतांना प्रश्न पूर्ण व्हायच्या आधीच पवारांनी त्यावर नाराजी व्यक्त करतांना प्रतिक्रिया देणार नसल्याचं नमुद केलं. संभाजी भिडे वगैरे काय प्रतिक्रिया देण्याच्या लायकीची माणसं आहेत का? काहीही प्रश्न विचारता का? म्हणूनच मी तुम्हाला भेटायचं नाही म्हणत होतो. हल्ले कसेही प्रश्न विचारतता. एकूणच आपल्या लोकांचा दर्जा फार उतरलेला आहे. संभाजी भिडे आणि अमुक-तमुक…, असं म्हणत शरद पवारांनी त्यांची प्रतिक्रिया आवरती घेतली.

भिडे काय म्हणाले होते?
मराठा आरक्षण हा कळीचा मुद्दा आहे. याचे उदाहरण देताना त्यांनी सांगलीतील कमांडो ट्रेनिंग कॅम्पचा उल्लेख केला. या ट्रेनिंग कॅम्पमध्ये नि:शुल्क प्रवेश दिला तर वाघ आणि सिंहांनी तिथं प्रवेश घ्यावा का? विमान उडविण्याच्या प्रशिक्षणासाठी गुरूडाने प्रवेश घ्यावा का? स्विमिंग क्लबमध्ये मासोळी प्रवेश घेईल का? अशाच पद्धतीने मराठ्यांनी आरक्षण मागावे का? असा सवाल भिडेंनी उपस्थित केला.
मराठ्यांना उभा देश चालवायचा आहे. आरक्षण कुठं मागता? सिंहांनी जंगल सांभाळायचे असते. मराठा जात ही संबंध देशाचा संसार चालवणारी जात आहे, हे मराठ्यांच्या ज्या दिवशी लक्षात येईल, त्या दिवशी मातृभूमीचे भाग्य उजळून जाईल. हे त्यांच्या लक्षात येत नाही, हे आपलं दुर्दैव आहे, असंही भिडे म्हणाले होते.

follow us