Nilesh Lanke : राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटाला सोडून शरद पवार गटात सामिल होणार असल्याची चर्चा रंगली. अशातच पुण्यात आज लंकेंनी शरद पवारांची भेट घेतली. भेटीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी शरद पवारसाहेब सांगतील तोच आदेश असल्याचं ठणकावून सांगितलं आहे. एका अर्थाने आपण शरद पवारांसोबतच असल्याचे संकेत लंकेंनी दिले आहेत.
उमेदवारी मिळाल्यानं वनवास संपला का? पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘मनात हूरहूर, राजकारण हा…’
पुस्तक प्रकाश सोहळ्याच्या निमित्ताने निलेश लंके यांनी शरद पवार यांची भेट घेतली. निलेश लंके यांनी कोरोना काळात केलेल्या कामांवर आधारित पुस्तक प्रकाश शरद पवार यांच्या हस्ते पार पडलं आहे. त्यानंतर निलेश लंके आता शरद पवार गटात प्रवेश करणार असं बोललं जात होतं, पण लंके यांचा शरद पवार गटात प्रवेश न होता त्यांनी सूचक विधान केलं आहे.
भाजपकडून नारी शक्तीचा सन्मान! लोकसभेच्या 20 उमेदवारांमध्ये पाच महिलांना दिलं स्थान
साहेब सांगतील तोच आदेश..
खासदारकीची आणि कुठल्याही निवडणुकीची शरद पवारांसोबत माझी चर्चा झालेली नाही. अजूनही मी पवारांच्या विचारधारेसोबत आहे. बहुजन समाजासह सर्वसामान्यांना घेऊन जाणारा जो नेता आहे त्या नेत्याची विचारधारेसोबत आहोत. शरद पवारसाहेब सांगतील तोच आदेश असल्याचं निलेश लंके यांनी स्पष्ट केलं आहे.
दोन ते तीन दिवसांपासून निलेश लंके शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. याबाबत निलेश लंके यांना माध्यमांकडून विचारण्यात आल्यानंतर अद्याप मी कोणताही निर्णय घेतला नसल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं होतं. त्यानंतर काल भाजपकडून लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये नगर दक्षिणचे खासदार सुजय विखे यांनाही पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानंतर आता निलेश लंके शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चांना चांगलाच ऊत आला होता.