Download App

शरद पवारांनी जितेंद्र आव्हाडांची पक्षातून हकालपट्टी करावी; महसूलमंत्र्यांची मागणी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्या प्रकरणात शरद पवारांनी जितेंद्र आव्हाड यांची पक्षातून हकालपट्टी करावी अस विखे पाटील म्हणाले.

Image Credit: Letsupp

Radhakrishna Vikhe Patli vs Jitendra Awhad : भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Vikhe Patli) यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. (Jitendra Awhad) राजकारणासाठी डाॅ.आंबेडकराच्या नावाचा वापर करणाऱ्या स्टंटबाज पुढाऱ्यांची शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षातून हकालपट्टी करावी आशी मागणी मंत्री विखे यांनी केली आहे.

Jitendra Awhad : आता सरकारमधील एकही मंत्री का बोलत नाही? रोजगार मेळाव्यावरून आव्हाडांचा सवाल

मंत्री विखे पाटील म्हणाले, भावनेच्या भरात आपण काय करतो याचं भान राहीलं नसलेल्या जितेंद्र आव्हाड यांनी केलेले कृत्य अतिशय निंदनीय असून, डाॅ आंबेडकरी विचाराच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या भावना या घटनेन दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे या गोष्टीची दखल घेत शरद पवारांनी त्यांची पक्षातू हकालपट्टी करावी असंही ते म्हणाले आहेत.

जितेंद्र आव्हाड यांच्या सारख्या काही स्टंटबाज नेत्यांनीच राज्याचं सामाजिक राजकीय वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न मागील काही दिवसांपासून सुरू केले आहेत. राजकारणात आता जनतेचे पाठबळ मिळत नसल्याने आशी कृत्य करून प्रसिध्दी मिळविण्याचा हव्यास करताना आमदार आव्हाड यांना भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा सुध्दा पुरली नाही हे अतिशय खेदजनक असल्याचंही मंत्री विखे पाटील म्हणाले आहेत.

अखेर जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा फाडणं आलं अंगलट

जेष्ठ नेते शरद पवार यांनी या कृत्याचा निषेध म्हणून आमदार आव्हाड यांची तातडीने पक्षातून हकालपटी केली पाहीजे आशी मागणी करून, भाररत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला आता कोणामुळे धोका आहे हे चेहरे सुध्दा आज या घटनेमुळे राज्याला समजले असल्याचं मंत्री विखे पाटील म्हणाले आहेत.

follow us

वेब स्टोरीज