Karnataka assembly election : आगामी निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरु करण्यात आली आहे. यातच कर्नाटक विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. कर्नाटकात 10 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे तर 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे. याच अनुषंगाने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महत्वाचे विधान केले आहे. कर्नाटकमध्ये या निवडणुकीत काँग्रेसचे सरकार येणार असा अंदाज शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान या निवडणुकीसाठी भाजपने देखील चांगलीच कंबर कसली आहे.
गौतमीच्या कार्यक्रमाला पोलिसांकडून रेड सिग्नल… गौतमी म्हणाली, मी पुन्हा येईन
नेमकं काय म्हणाले शरद पवार?
कर्नाटकासह इतर राज्यातील विधानसभा निवडणुकांबाबत शरद पवारांना विचारण्यात आले असता पवार म्हणाले, देशामध्ये 2 प्रकारच्या निवडणुका होतात. एक राष्ट्रीय पातळीवर आणि दुसरी राज्य पातळीवर. राज्याच्या निवडणुका वेगळ्या असतात असे माझं वैयक्तिक मत आहे. तुम्ही देश आणि राज्य बघाल तर, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणात बिगर भाजपा सरकार आहे. आता कर्नाटकातील निवडणुका बघितल्या तर, तिथंही काँग्रेस सरकार येईल असा अंदाज पवारांनी व्यक्त केला.
पवार म्हणाले…हिंडेनबर्ग कोण आहे? मला माहिती नाही
मध्यप्रदेशातील सरकार भाजपनं पाडलं
मध्य प्रदेशात काँग्रेसचे सरकार अस्तित्वात होते, मात्र याठिकाणी भाजपने आमदार फोडून तिथे भाजपचं सरकार स्थापन केले. मात्र आता मध्य प्रदेशात निवडणुका झाल्यास परिस्थिती बदलू शकते. राजस्थान, पंजाब, दिल्ली, पश्चिम बंगालमध्ये बिगर भाजपा सरकार आहे. जेव्हा संपूर्ण देशात राष्ट्रीय निवडणुका येतील, तेव्हा आम्ही सर्वजण मिळून काहीतरी करू, तर चित्र वेगळे असेल. मात्र हे बोलताना पवार म्हणाले की, भाजपाकडे दुर्लक्ष करणे इतके सोपे राहणार नाही, जोपर्यंत आपण एकत्र काहीतरी करत नाही.