Download App

शरद पवारांच्या वक्तव्यानंतर मंत्री अमित शाह यांचा महाराष्ट्र दौरा, चर्चांना उधाण

आगामी विधानसभा निवडणुकीचे वेध राजकीय नेत्यांना लागल्याचं दिसून येतंय. अशातच राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी महाविकास आघाडी एकत्रच लढणार की नाही? याबद्दल शंका व्यक्त केली आहे. त्यानंतर अचानक केंद्रीय मंत्री अमित शाह हे महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यांच्या या दौऱ्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.

Adipurusha: ओम राऊतचा ‘आदिपुरुष’ चित्रपटाबद्दलचं मोठं गौप्यस्फोट, म्हणाला…

एकीकडे महाविकास आघाडीकडून आगामी निवडणूक एकत्र लढवणार की? स्वबळावर याबाबत संभ्रम निर्माण झालाय, कारण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणुकीबद्दल मोठं विधान केलं आहे. आगामी निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढवतीलच, याबद्दल सांगता येत नसल्याचं शरद पवारांनी म्हंटलं होतं. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली होती.

दरम्यान, राज्यात सध्या आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी सरकारकडून राज्यभरात वज्रमुठ सभांचं आयोजन करण्यात आलंय तर भाजपच्या नेत्यांकडूनही विविध जिल्ह्यांत दांडगा जनसंपर्क ठेऊन भाजपच्या कोट्यात मतं फिरण्यासाठी ताकद लावली जात आहे. अलीकडेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अहमदनगर दौरा केला.

एमपीएससी म्हणजे Maharashtra Public Shocking Commission; डेटा लीक प्रकरणात अमित ठाकरेंची उडी

यावेळी त्यांनी शिर्डीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. त्यानंतर आता पुन्हा एकदा येत्या 26 तारखेला बावनकुळे अहमदनगरच्या श्रीरामपूर तालुक्यात भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. मागील आठवड्यातच केंद्रीय मंत्री अमित शाह महाराष्ट्र भूषण सोहळ्याला आले. मंत्री शाह आले त्यावेळी शिंदे-फडणवीस सरकारकडून मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करण्यात आलं.

या सोहळ्यात आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला. यावेळी धर्माधिकारी यांचे श्रीसदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. मतमतांतरासाठीच हा सोहळा शिंदे-फडणवीस सरकारने घेतला असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला.

दरम्यान, शरद पवारांच्या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात चर्चा रंगली असून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आम्ही एकत्र लढवणार असल्याचं ठामपणे सांगितलं आहे. अशातच आता केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या अचनाक महाराष्ट्र दौऱ्यामुळे भविष्यातले राजकीय समीकरणं बदलणार आहेत का? याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत.

Tags

follow us