Download App

ठाकरे-पवारांचं रौद्र रूप! लोकसभेपूर्वीच ‘दोन जखमी वाघांची’ डरकाळी; अनेकांना धसका

  • Written By: Last Updated:

लोणावळा/औसा : लोकसभा निवडणुकांच्या तारखांची येत्या एक ते दोन दिवसात घोषणा केली जाणार आहे. मात्र, त्याआधीच राज्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. याची सुरूवात स्वतःचे पक्ष फुटलेल्या ठाकरे आणि पवारांनी केली आहे. भविष्यात कुणी पुन्हा वाकड्यात गेलं तर, मला शरद पवार म्हणतात एवढं लक्षात ठेवा असा गर्भित इशारा अजितदादांचे शिलेदार सिनील शेळकेंना दिला आहे. तर, दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांनी मोदींना वाचवलं नसतं तर, ते कचऱ्याचा डब्यात असते असे आक्रमक विधान केले आहे. त्यामुळे पक्ष फुटलेल्या दोन्ही जखमी वाघांनी एकाच दिवशी फोडलेल्या आक्रमक डरकाळीचा अनेकांनी धसका घेतला आहे. (Uddhav Thackeray Sharad Pawar Aggressive Statement Announcement )

भाजपनं डाव बदलला; अमित शाहंच्या दौऱ्यानंतर पंकजा मुंडे अन् गडकरींचं नाव पुन्हा रेसमध्ये…

मला शरद पवार म्हणतात लोणावळ्यात पवार भिडले

आज (दि.7) लोणावळ्यात शरद पवार गटाचा कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मावळचे माजी आमदार मदन बाफना यांनी पवारांना अजित पवार गटाचे विद्यामान आमदार सुनीळ शेळके धमाकावत असल्याचे सांगितले. बाफना यांच्या या तक्रारीनंतर शरद पवारांनी (Sharad Pawar) भर मेळाव्यात शेळकेंना सज्जड दम भरत तू आमदार कुणामुळे झाला त्यावेळी सभेला इथे कोण आलं होतं. त्यावेळी तुझ्या पक्षाचा अध्यक्ष कोण होता असा खडा सवाल केला. एवढेच नव्हे तर, उमेदवारीचा फॉर्म भरताना पक्षाचं चिन्ह आणि नेत्याची सही लागते ती सही माझी असल्याची आठवणही शेळकेंना यावेळी पवारांनी करून दिली.

पवार कुटुंब, सगळे भाऊ, वहिनी माझा प्रचार करणार; सुप्रिया सुळेंनी सांगितला विजयाचा ‘इनसाईड प्लॅन’

जे कार्यकर्ते आणि माजी आमदार तुम्हाला निवडणून आणण्यासाठी राबले त्यांनाच तुम्ही दमदाटी करता. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की, एकदा दमदाटी केली तेवढी बास्स पुन्हा असं काही केलं ‘मला शरद पवार म्हणतात एवढं लक्षात ठेवा’. तसेच मी या रस्त्याने कधी जात नाही मात्र, या रस्त्याने जाण्याची कुणी स्थिती निर्माण केली तर, त्याला सोडतही नाही अशी सज्जड तंबी पवारांनी शेळकेंसह अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दिली आहे.

…तर मोदी कचऱ्याच्या डब्यात दिसले असते

तर, दुसरीकडे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीदेखील आक्रमक विधान करत औसा येथे थेट मोदींच्या अस्तित्त्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत बाळासाहेब नसते तर मोदी कचऱ्याच्या पेटीत दिसले असते असे विधान केले. ज्यावेळी मोदी नाव कुणाला माहिती नव्हतं तेव्हाही आम्ही धाराशिव जिंकत होतो. शिवसेनाप्रमुख होते, म्हणून मोदी तुम्हाला दिसतायत असे सांगत आम्हाला मोदींचं कौतुक सांगू नका. आम्हाला आमचे कट्टर शिवसैनिक आणि जीवाला जीव देणारे कट्ट्रर मावळे पुरेसे आहेत. जेव्हा अटल बिहारी वाजपेयी मोदींना कचऱ्याच्या पेटीत टाकायला निघाले होते, तेव्हा हिंदुह्रदयसम्राट शिवसेना प्रमुखांनी मोदींना वाचवलं नसतं तर, मोदीच दिसले नसते असा आक्रमक पवित्रा ठाकरेंनी औसा येथे बोलताना घेतलेला दिसला.

शेपूटघाल्या गृहमंत्री माझ्यावर फणा काढतोयं…

ठाकरेंनी केवळ मोदींवरचं भाष्य केले असे नाही तर, त्यांना नुतकत्याच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येऊन गेलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाहंचाही खरपूस समाचार घेतला. शाहंवर बोलताना ठाकरेंची जीभ घसरल्याचे दिसले. जळगाव येथे बोलताना शाहंनी ठाकरेंवर भाष्य केले होते. त्यावर प्रत्युत्तर देताना देशाच्या गृहमंत्र्यांना मणिपूर पेटलं तिकडे जायची हिंमत नाही आणि महाराष्ट्रात फणा काढत आहेत. या नागोबाची काश्मिरमध्ये जायची हिंमत नाही. तिथे शेपूट.अरुणाचलमध्ये चीन घुसतोय तिथे शेपूट. अशा शेपूट घाल्या गृहमंत्री महाराष्ट्रात येऊन आमच्यावर फणा काढतोय असे म्हणत शिवसेना भाजपाला गाडून मूठमाती देऊन पुढे जाईल, असा जोरदार प्रहार ठाकरेंनी शाहंचा समाचार घेताना केला आहे.

जखमी वाघांच्या डरकाळीने अनेकांना धसका

एकूणच काय तर, ठाकरे आणि पवार यांचा पक्ष फुटल्यानंतर भाजपसोबत गेलेल्या अजितदादा आणि शिंदेंचे नेते पवार आणि ठाकरेंवर जोरदार टीका करत आले आहेत. या टीकांना पवार आणि ठाकारेंनी वेळोवेळी प्रत्युत्तर दिलेच आहे. पण आज दोन्ही नेत्यांनी लोकसभेपूर्वी ज्या पद्धतीने आक्रमक विधानं केली आहेत ती बघता लोकसभेच्या प्रचारादरम्यान आरोप प्रत्यारोपांच्या फोडणीचा ठसका अनेकांना लागेल हे मात्र नक्की झाले आहे. तर, पवार ठाकरेंनी एकाच दिवशी फोडलेली डरकाळी अनेकांच्या धडकी भरवणारी असून, येत्या काळात हे दोन्ही नेते अधिक आक्रमक होतील असे चित्र आता दिसू लागले आहे.

follow us