Download App

Sharad Pawar Threat : धमकी प्रकरणावर शरद पवारांचं सडेतोड भाष्य, म्हणाले…

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर देशात एकच खळबळ उडाली आहे. फक्त शरद पवारच नाहीतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि सुनिल राऊत यांनाही धमकी देण्यात आलीय. धमकीच्या प्रकरणावर आमचा आवाजच बंद करणार असाल तर तो तुमचा गैरसमज असल्याचं शरद पवारांनी ठणकावून सांगितलं आहे.

Saraswati Vaidya नाही तर ‘सरस्वती मनोज साने’ : दोघांचे लग्न झाल्याचे पोलीस तपासात उघड

पुढे बोलताना ते म्हणाले, राज्यातील प्रत्येक नागरिकाला राज्यघटनेनूसार कोणत्याही पक्षाबाबत आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे धमक्या देऊन आवाज बंद करु शकतो, असं कोणाला वाटतं असेल तर तो गैरसमज असल्याचं पवार म्हणाले आहेत.

Kajol : ‘आयुष्यातील कठीण टप्प्यातून जात आहे’ म्हणत काजोलनं उचललं मोठं पाऊल !

कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांच्या व्यवस्थेवर आणि क्षमतेवर माझा पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे मला त्याची चिंता नसल्याचंही शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्राचे पोलीस दल सक्षम असून त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे.

शुश्रूषागृहांनी रुग्णांची आर्थिक स्थिती लक्षात न घेता उपचार द्यावे; आरोग्य संचालनालयाचे निर्देश

राज्यातील कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे त्यांनी यासंबंधी काळजी घ्यावी, असे पवारांनी म्हटले आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ट्विटरच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी आल्याने राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सकाळी मुंबई पोलिस आयुक्त यांची भेट घेत तक्रार दाखल केली.

दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि आमदार सुनील राऊत यांना एका महिन्याच्या आत गोळ्या घालणार आणि स्मशानात पाठवणार, अशी धमकी देण्यात आली आहे. सुनील राऊत यांना हा धमकीचा कॉल आला. त्यावरही शरद पवारांनी सज्जड इशारा दिला आहे.

Tags

follow us