शुश्रूषागृहांनी रुग्णांची आर्थिक स्थिती लक्षात न घेता उपचार द्यावे; आरोग्य संचालनालयाचे निर्देश

शुश्रूषागृहांनी रुग्णांची आर्थिक स्थिती लक्षात न घेता उपचार द्यावे; आरोग्य संचालनालयाचे निर्देश

Directorate of Health Notice to Indian Medical Association : अनेकदा उपचार घेण्यासाठी आर्थिक स्थिती बेताची नसल्याने रुग्णांना उपचारापासून वंचित राहावे लागते. मात्र, आरोग्य संचालनालयाने (Directorate of Health)काल एक महत्वपूर्ण निर्देश इंडियन मेडिकल असोशिएशनला (Indian Medical Association) दिले आहेत. गंभीर अपघातग्रस्त रुग्ण, हृदयविकाराचा झटका येणारी व्यक्ती किंवा इतर गंभीर रुग्ण शुश्रूषागृहात (Nursing Home)आल्यास त्याची आर्थिक स्थिती लक्षात न घेता त्यांना प्राधान्याने उपचार दिले जावेत. त्यानंतरच त्यांना जवळच्या मोठ्या रुग्णालयात हलवावे, अशा सूचना आरोग्य संचालनालयाने इंडियन मेडिकल असोसिएशनसोबत (आयएमए) नुकत्याच झालेल्या बैठकीत दिल्या आहेत. (A nursing home cannot deny treatment to a critically ill patient! Direction of Directorate of Health to ‘IMA’)

क्लिनिकल आस्थापना कायद्याबाबत आरोग्य संचालनालय आणि IMA यांच्यात काल एक बैठक झाली. गंभीर आजारी रुग्णांवर नर्सिंग होममध्ये उपचार करणे आणि त्यांचे प्राण वाचवणे याला प्राधान्य दिले जावे. हे प्राथमिक उपचार देताना रुग्णाच्या आर्थिक क्षमतेचा विचार केला जाऊ नये. त्याची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्याला जवळच्या रुग्णालयात वैद्यकीय चिठ्ठीसह पाठवावे. गोल्डन अवर उपचार पद्धतीचे नियम काटेकोरपणे पाळावे, असे आरोग्य संचालनालयाने आयएमएला निर्देश दिले आहेत.

दोन्ही काँग्रेसच्या पराभवाचा बावनकुळेंचा भन्नाट फॉर्म्युला; म्हणाले, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना..

राज्यातील प्रत्येक नर्सिंग होमने त्यांच्या सेवेच्या व्याप्तीनुसार प्रशिक्षित वैद्यकीय आणि पॅरामेडिकल कर्मचार्‍यांसह मूलभूत आपत्कालीन सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. संचालनालयाने सुचवले की, प्रत्येक नर्सिंग होमने आपत्कालीन आणि आपत्तींमध्ये रूग्णांचे प्राण वाचवण्यासाठी आपल्या सुविधा आणि कौशल्यक्षम तज्ञ अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. नर्सिंग होममध्ये आवश्यक त्या सुविधा आणि साधने उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही आरोग्य संचालनालयाने दिल्या आहेत.

कोणत्याही रुग्णाला गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णाला प्रथमोपचार देणे ही आपली जबाबदारी आहे. ती आम्ही चोख बजावू. मात्र, हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णाला किंवा अपघातात हात-पाय मोडलेल्या रुग्णाला जवळच्या नर्सिंग होममध्ये नेल्यावर तिथे हृदयरोग विभाग किंवा अस्थिव्यंग विभाग नसल्यास रुग्णावर योग्य उपचार होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे रुग्णाची प्रकृती स्थिर होईपर्यंत त्याला नर्सिंग होममध्ये ठेवण्याचा नियम शिथिल केला पाहिजे. तसेच, नर्सिंग होममध्ये तीन ते चार खाटा असल्यास गंभीर रुग्णांसाठी खाटा उपलब्ध करून देणे शक्य होणार नाही. त्यामुळे ५० पेक्षा जास्त खाटा असलेल्या रुग्णालयांसाठी ही अट ठेवावी, असे आयएमएचे सचिव संतोष कदम यांनी सांगितले.

आरोग्य संचालनालयाने ‘आयएमए’ला नर्सिंग होममध्ये रुग्णांना उपलब्ध असलेल्या सर्व सुविधांचे शुल्क दर्शनी भागात प्रदर्शित करण्याचे निर्देश दिले आहेत. संचालनालयाने प्रवेश शुल्क, बेड आणि इंटेन्सिव्ह केअर युनिटचे दैनंदिन शुल्क, डॉक्टर, भूलतज्ज्ञ शुल्क, शस्त्रक्रिया कक्ष शुल्क, नर्स शुल्क, मल्टीपॅरामीटर मॉनिटर फी, पॅथॉलॉजी फी, व्हेंटिलेटर फी, एक्स-रे आणि सोनोग्राफी शुल्क याबाबत सविस्तर माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube