Download App

कंत्राटी भरतीविरोधात शरद पवार आक्रमक, मुली बेपत्ता होण्यावरुनही सरकारला सुनावले

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी कंत्राटी भरतीवरुन (Contract recruitment) राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्यात जी यंत्रणा आहे ती सक्षम केली तर अडचण येणार नाही, माझी मागणी आहे की सरकारने कायम स्वरुपी भरती करावी, अशी मागणी शरद पवार यांनी केली.

ते पुढं म्हणाले की राज्याची स्थिती गंभीर आहे. आवश्यक खबरदारी आणि उपाय योजना करणे गरजेचं आहे. तरुण मुलांची भेट झाली त्यांनी शासकीय भरती कंत्राटी पद्धतीने करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याबाबत चिंता व्यक्त केली. तरुणांच म्हणणं आहे की पोलीस दलात कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय घेतला. 11 महिन्यासाठी ही भरती आहे. त्यानंतर या मुलांनी काय करायचं हा प्रश्न आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना पोलीस विषयाची ज्ञान आणि प्रशिक्षण नसेल तर ही चिंतेची बाबा होईल, असे शरद पवार यांनी म्हटले.

राज्यात कायदा आणि सुव्यवस्था याबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. नागपूरबाबत वेगळी चर्चा सुरु आहे. पावसाळी अधिवेशनात काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यामध्ये असं लक्षात आलं की 1 जानेवारी 2023 ते 31 में 2023 या कालावधीत राज्यात 19 हजार 553 तरुणी आणि महिला बेपत्ता झाल्या आहेत. 1453 मुली आहेत उवर्रित महिला आहेत, असे शरद पवार यांनी म्हटले.

Ahmednagar News : पाणीबाणी! काही होऊ जायकवाडीला पाणी जाऊ देणार नाही…

शरद पवार पुढं म्हणाले की काही हॉस्पिटलमध्ये बाल रुग्ण मृत्यू झाले अनेक सरकारी रुग्णालयात जागा रिक्त आहेत त्या ठिकाणी 2800 जागा तात्पुरत्या पद्धतीने भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला.

खाजगी कंपन्या शाळा दिल्या तर काय होऊ शकतं याचं उदाहरण म्हणजे एका मद्य कंपनीला शाळा देण्यात आली नाशिक जिल्ह्यात. तिथं गौतमी पाटील हिच्या नृत्याचा कार्यक्रम तिथं करण्यात आला. ही गोष्ट अतिशय चिंतेची आहे, असे शरद पवार यांनी म्हटले.

लोकसभा निवडणुकीपूर्वी आमदार अपात्रतेचा निर्णय घ्यावा : सुप्रीम कोर्टाचे विधानसभा अध्यक्षांना निर्देश

20 पेक्षा कमी पट संख्या असेल तिचे समायोजन करण्यात येते. आता शाळा बंद करण्याचा निर्णय घेत आहे. याचा मुलींच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होईल. तर प्राथमिक शाळांची 30 हजार पदं रिक्त आहेत. कंत्राटी पद्धतीने भरती होत असताना त्यामध्ये आरक्षण तरतूद नाही, असे शरद पवार यांनी म्हटले.

Tags

follow us