Download App

Sharad Pawar : शरद पवारांचा काटेवाडी ते दिल्लीपर्यंतचा राजकीय प्रवास…

पुण्यातील बारामती इथल्या काटेवाडीत जन्मलेल्या शरद पवारांचा थक्क करणारा राजकीय प्रवास झंझावतपणे आत्तापर्यंत सुरु होता. आता शरद पवार राजकारणातून संन्यास घेणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी आपण राजकारणातून निवृत्ती घेणार असल्याचं जाहीर केलंय.

‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्राचा दुसरा भाग प्रकाशनाच्या कार्यक्रमात शरद पवारांनी राजीनाम्याचं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर कार्यकर्त्यांकडून शरद पवारांच्या निर्णयाला विरोध केला जात असून गोंधळ घातला जात आहे. मात्र, विधानसभा सदस्य ते केंद्रीय मंत्रीपर्यंतचा पवार यांचा प्रवास कसा होता हे आपण जाणून घेणार आहोत.

Sharad Pawar Retirement :पवारांच्या निर्णयावर वंचितची चुप्पी, कार्यकर्त्यांना दिल्या ‘या’ सूचना

12 डिसेंबर 1940 साली काटेवाडीत जन्म घेतलेल्या शरद पवारांनी ‘गोवा मुक्ती सत्याग्रहाला’ पाठिंबा देण्यासाठी एक विद्यार्थ्यांची रॅली आयोजित केली. इथूनच त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली होती. त्यानंतर 1967 साली पहिल्यांदा कोठेवाडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत भरघोस मतांनी शरद पवारांनी विधानसभेत प्रवेश केला होता. यशवंतराव चव्हाण यांच्या सरकारच्या काळात शरद पवार मंत्रीही झाले.

1977 मधल्या आणीबाणीनंतर काँग्रेसचे दोन गट पडले. यशवंतराव चव्हाण यांच्यासह वसंतदादा पाटील, शरद पवार हे ‘रेड्डी कॉंग्रेस’मध्ये गेले. 1978 मध्ये निवडणुका झाल्यानंतर काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकदा एकत्र आले. त्यावेळी वसंतदादा पाटील मुख्यमंत्री बनले. मात्र या सरकारमध्ये अनेक नेते अस्वस्थ होते यामध्ये शरद पवार देखील होते. त्यानंतर शरद पवार हे 40 समर्थांसह बाहेर पडले आणि आघाडीचे सरकार कोसळले.

Bchhu kadu : वज्रमूठ तुटणार! ‘सामंत-पवारांची भेट म्हणजे राजकीय भूकंपाचे संकेत’

जुलै 1978 मध्ये ‘पुरोगामी लोकशाही दलाचे’ नेते म्हणून शरद पवार हे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. पहिल्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर शरद पवार यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या विकासासाठी अनेक धाडसी निर्णय घेतले होते. त्यामुळे ते दुसऱ्यांदा 1988 मध्ये पुन्हा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. त्यावेळी 1 मुख्यमंत्रिपदी पवार मुख्यमंत्री होते.

तसेच 1990 साली तिसऱ्यांचा मुख्यमंत्री होण्याचा मान पवारांनी पटकावला. त्यावेळी 1 वर्ष 6 महिने त्यांनी आपली मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी चोख पार पाडली. त्याचवेळी त्यांच्या कार्याची दखल घेत पी.व्ही.नरसिंहराव सरकारच्या काळात त्यांची दिल्लीवारी झाली. नरसिंहराव सरकारच्या मंत्रिमंडळात पवार 1991 साली देशाचे संरक्षण मंत्रीही होते.

औकात, औलाद आणि यांचा इतिहास देखील तोच, भाई जगतापांचा भाजपवर हल्लाबोल

मात्र, 1992 झालेल्या बाबरी मशीद दंगलीनंतर त्यांची पायमुळे पुन्हा महाराष्ट्राकडे वळली. 1993 साली ते सलग चौथ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. पवार चौथ्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी 2 वर्ष 8 दिवस मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ सांभाळला. दरम्यान, आपल्या मुख्यमंत्रीपदाचा पाच वर्षांचा कालावधी शरद पवार एकदाही पूर्ण करु शकले नाहीत.

त्यानंतर पवारांनी पुन्हा देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळात दाखल होत 2004 ते 2014 असे सलग 10 वर्ष केंद्रीय कृषीमंत्री म्हणून शरद पवारांनी धुरा सांभाळली. तसेच 2005 साली त्यांची भारतीय क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदी निवड त्यानंतर आंतराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवलंय.

2019 साली शिवसेनेने भाजपसोबत काडीमोड घेतल्यानंतर सत्तेची सूत्र बदलली. पवारांच्या नेतृत्वात राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना एकत्र येत महाविकास आघाडीने सरकार स्थापन केलं. दरम्यान, महाविकास आघाडीच्या काळात एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर राज्यात शिंदे गट आणि भाजपची सत्ता स्थापन झाली. दरम्यान, मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात शरद पवारांच्या राजीनाम्याच्या वक्तव्यानंतर राजकारणात एकच खळबळ उडालीय.

Tags

follow us