Sharad Pawar Retirement :पवारांच्या निर्णयावर वंचितची चुप्पी, कार्यकर्त्यांना दिल्या ‘या’ सूचना

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 02T164943.140

Sharad Pawar Retirement : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज त्यांच्या निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्राच्या दुसऱ्या भागाचे प्रकाशन आज आयोजित करण्यात आले होते. त्यांच्या निर्णयानंतर अनेक कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच काँग्रेसचे नेते नाना पटोले व अशोक चव्हाण यांनी भाष्य केले आहे. तसेच आता राज्याचे उपमुख्यमंत्री व भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीची देखील यावर प्रतिक्रिया आली आहे.

वंचित बहुजन  आघाडीच्या ट्विटर हँडेलवरुन त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अंतर्गत घडामोडी संदर्भात भूमिका मांडू नये. तो त्यांचा पक्षांतर्गत मामला असल्याने आपण त्यासंदर्भात सोशल मीडियावर भूमिका मांडू नयेत असे निर्देश सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना देण्यात येत आहेत, असे वंचित बहुजन आघाडीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Ashok Chavan : पवारांनी निवृत्तीची घोषणा करणं हा राष्ट्रवादीचा अंतर्गत विषय

दरम्यान, शरद पवारांच्या या निर्णयावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. हा त्यांच्या पक्षातील निर्णय आहे. योग्य वेळी आम्ही यावर प्रतिक्रिया देऊ. पण हा त्यांच्या वैयक्तीक निर्णय आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील हा अंतर्गत विषय आहे. यावर अजून चर्चा सुरु आहे. याबाबत आम्हाला काहीही माहित नाही. आत्ता यावर बोलणं प्रीमॅच्युअर राहील. त्यामुळे मी यावर आत्ता बोलणार नाही. आम्ही या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, योग्य वेळी आम्ही प्रतिक्रिया देऊ, असे ते म्हणाले आहेत.

सुप्रिया सुळेंकडे पक्ष सोपवण्याचा पवारांचा प्लान? मित्राकडूनच मोठा दावा

याआधी शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणांनंतर  सभागृहामध्ये शरद पवारांच्या नावाच्या घोषणांचा अक्षरक्षः पाऊस पडला. ‘महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार’ असे कार्यकर्ते म्हणत होते. यानंतर अनेक नेत्यांना अश्रू अनावरदेखील झाले. धनंजय मुंडे हे देखील शरद पवारांच्या पाया पडलेले पहायला मिळाले.

Tags

follow us