Download App

Atiq Ahmed : कायदा हातात घेतला तर ते योग्य नाही….; अतिक अहमदच्या हत्येवर पवारांचा नाव घेता भाजपवर निशाणा

  • Written By: Last Updated:

Sharad Pawar’s Said It is not right if the law is taken into hand : शनिवारी प्रयागराजमध्ये कुख्यात गॅंगस्टर अतिक अहमद (Atiq Ahmed) आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद (Ashraf Ahmed) या दोघांची शनिवारी खुलेआमपणे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या दुहेरी हत्याकांडाच्या घटनेने केवळ उत्तरप्रदेशातच नाही, तर देशातही खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, पोलिसांच्या सुरक्षेत असतांनाच त्यांची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळं ही घटना सध्या देशभर चर्चेचा विषय ठरत आहे. माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांच्या हत्येवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यावर आता राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाष्य केलं. शरद पवार यांनी कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत अप्रत्यक्षपणे भाजपवर (BJP) या प्रकरणावरून निशाणा साधला आहे.

यावेळी पवार बोलतांना म्हणाले की, देश संविधानानुसार चालतो पण, त्याकडे दुर्लक्ष करून चालवण्याची सवय सत्ताधाऱ्यांनी लावली तर आपण चुकीच्या मार्गाने जाऊ. जर कोणी चूक केली तर त्याच्यावर कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे असं पवारांनी सांगितलं.

मुंबईत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने इफ्तार पार्टींच आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीला शरद पवार यांच्यासह सुप्रिया सुळे, अजित पवार, दिलीप वळसे-पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक नेते उपस्थित होते. दुपारी आपल्या कथीत बंडाबाबतच्या चर्चांवर अजित पवारांनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर ते या पार्टीत काहीसे निवांत पाहायला मिळाले.
Nana Patole : भाजपने दुसऱ्यांची घरे फोडून आपले घर सजवू नये…

दरम्यान, शरद पवार यांनी उपस्थितींना मार्गदर्शन केलं. ते म्हणाले की, देशात शांतता, बंधुता पसरवावी लागेल, आज देशात परिस्थिती वेगळी आहे. समानतेचा संदेश प्रत्येक घराघरात पोहोचवायला हवा. संविधानानुसार आणि कायद्यानुसार देश चालतो. संविधान आणि कायद्याकडे दुर्लक्ष करून पावलं उचलण्याची सवय सत्ताधाऱ्यांनी लावली तर आपण चुकीच्या मार्गावर जाऊ. संविधान आणि कायदा हातात घेऊन चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन दिलं जातं. तसेच हे चांगलंच असल्याचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असले तर ते देशासाठी योग्य नाही, असं पवार म्हणाले.

दरम्यान, कायदा आणि सुव्यवस्था सोबत ठेवण्याची गरज असून त्यासाठी राष्ट्रवादी नेहमीच काम करेल, असं ते म्हणाले.

Tags

follow us