Nana Patole : भाजपने दुसऱ्यांची घरे फोडून आपले घर सजवू नये…

Nana Patole : भाजपने दुसऱ्यांची घरे फोडून आपले घर सजवू नये…

भाजपने दुसऱ्यांची घरे फोडून आपले घर सजवू नये, असा सल्ला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. दरम्यान, काही दिवसांपासून अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. अखेर अजित पवारांच्या या चर्चेबद्दल नाना पटोलेंनी बोलणं टाळलं असून त्यांनी याउलट भाजपला सल्ला दिला आहे. यावेळी त्यांनी भाजप कसं आहे याबाबत सांगत निशाणा साधला आहे.

खेळ अजून संपला नाही; स्पष्टीकरणानंतर अजितदादांचा फडणवीसांना फोन

पटोले म्हणाले, मी भाजपची खासदारकी सोडून आलो आहे. ते लोक कसे आहेत, याची मला पूर्ण कल्पना आहे. भाजप हा लोकशाही विरोधातील पक्ष आहे. भाजपने दुसऱ्यांची घरे फोडून आपले घर सजवू नये, सध्या महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले असल्याचं ते म्हणाले आहेत.

ज्या पक्षाचं मुखपत्र आहे त्याबद्दल… विधानभवनातून अजित पवारांचा राऊतांवर रोख…

नाना पटोले आज अकोले दौऱ्यावर होते. काँग्रेस कधीच दुसऱ्यांच्या घरात काय चाललंय हे डोकावून पाहण्याच काम कधी करत नसल्याचे त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे भाजपनेही दुसऱ्यांची घर फोडून स्वतःचे घर सजवू नये, असं ते म्हणाले आहेत.

…तर शिंदे गट सत्तेतून बाहेर पडणार; अजितदादांच्या भाजपसोबत जाण्यावर शिरसाटांचे मोठे विधान

भाजपबद्दल नागरिकांमध्ये पूर्वीसारखी सहानुभूती राहिलेली नाही. अकोल्यात देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या उमेदवारास पदवीधरांनी पराभूत केले. त्यामुळे भाजपबद्दल नागरिकांमध्ये रोष वाढत असल्याचे दिसून येत असल्याचेही नाना पटोले म्हणाले.

Atiq & Ashraf हत्याप्रकरण म्हणजे मिटवण्याची कला, सिब्बलांचं संशयास्पद गोष्टींकडे इशार

दरम्यान, यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवरही टीकास्त्र सोडले आहे. अवकाळी पावसाने शेतकरी हवालदिल झाला असून नुकसान भरपाई मिळत नाही. बेरोजगारीमुळे तरुण हैराण असल्याचं ते म्हणालेत. हे प्रश्न सोडवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काँग्रेस प्राधान्याने काम करीत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.

दुसरीकडे सत्ताधारी दुसऱ्यांच्या घरात डोकाव, त्याच्या घरात डोकाव, मग घरे फोडा, दुसऱ्या पक्षांचे लोक तोडा, यातच गुंतली असल्याचा घणाघात नाना पटोले यांनी केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube