Atiq & Ashraf हत्याप्रकरण म्हणजे मिटवण्याची कला, सिब्बलांचं संशयास्पद गोष्टींकडे इशार

Atiq Ahmed Murder Uttar Pradesh

Kapil Sibal On Atiq Ahmed Murder : शनिवारी (15 एप्रिल) रात्री 10.30 वाजता उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील कोल्विन हॉस्पिटलजवळ माफिया अतिक अहमद (Atiq Ahmed) आणि अशरफ (Ashraf Ahmed) यांची तीन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. पोलीस कोठडीत दोन्ही भावांची हत्या झाल्यानंतर संपूर्ण विभागात खळबळ उडाली होती. अतिक आणि अशरफ यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेले जात असताना, ते प्रसारमाध्यमांशी बोलण्यासाठी थांबले असताना ही घटना घडली.

विरोधक आता अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्या हत्येवरून सरकारवर हल्लाबोल करत आहेत. यामध्ये यावर आता राज्यसभेचे खासदार कपिल सिब्बल यानी देखील या प्रकरणावर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. माजी कॉंग्रेस नेते आणि ज्येष्ठ वकील असलेले कपिल सिब्बल यांनी सोमवारी 17 एप्रिलला एक ट्विट केलं आहे.

यामध्ये त्यांनी लिहीलं की, “मिटवण्याची कला, अश्चर्याची गोष्ट आहे – अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांना रात्री 10 वाजता मेडिकल चेकअप नेण्यात आलं, काहीही मेडिकल इमरजन्सी नव्हती, त्यांना चालत घेऊन जात होते. मिडीयाशी त्यांना बोलू दिलं गेलं. मारेकरी एकमेकांना ओळखतही नव्हते. त्यांच्याकडे 7 लाखांहून अधिक किंमतीचे हत्यार होते. त्यांनी एखाद्या प्रशिक्षित शूटरप्रमाणे शूट केल, सर्वंनी शरणागती पत्करली. असं ट्विट त्यांनी केलं आहे.

माफिया अतिक अहमदने हत्येपूर्वी सुप्रीम कोर्टाला पत्र लिहिले होते, मारेकऱ्याचा केला होता उल्लेख

सिब्बल यांच्यासह सपाचे राष्ट्रीय मुख्य सरचिटणीस प्रा. रामगोपाल यादव यांनी अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्या हत्येवरून सरकारवर हल्लाबोल करत, त्यांची हत्या नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आली आहे. अतिक अहमद आणि असदच्या एन्काउंटरनंतर अतिकच्या बाकीच्या मुलांचाही खून होणार आहे, असा गौप्यस्फोट रामगोपाल यादव यांनी केला आहे.

Tags

follow us