Download App

Maharashtra Politics : शिंदे गटाकडून भाजप कार्यकर्त्यावर हल्ला; ठाकरेंनी केली दरेकरांशी चर्चा

Maharashtra Politics : भाजपचे कार्यकर्ते बिभीषण वारे यांच्यावर काल  हल्ला झाला आहे. हा हल्ला शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आल्यची माहिती आहे. या हल्ल्यावरुन भाजप नेते प्रवीण दरेकर हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी आज विधानपरिषदेत देखील याविरोधात जोरदार आवाज उठवला. यानंतनर विधीमंडळाच्या आवारात प्रवीण दरेकर व ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे चर्चा करताना दिसले.

दहिसर येथे काल भाजपच्या कार्यकर्त्याला मारहाण झाली यानंतर आदित्य ठाकरे यांनी प्रवीण दरेकरांशी चर्चा केली आहे. विधीमंडळाच्या आवारात हे दोन्ही नेते चर्चा करताना दिसले. यावेळी बोलताना, तुम्ही त्यांना वाढवले असे असे दरेकर ठाकरेंना म्हणाले. तर तुम्ही त्यांना डोक्यावर बसवले म्हणत दरेकरांना टोला लगावला. यावर दोघेही आपलेच असल्याचे दरेकर म्हणाले आहेत.

Big Breaking : शासकीय कर्मचाऱ्यांचा संप मागे; सरकार सोबतची बोलणी यशस्वी

तसेच महाराष्ट्रात आत्तापर्यंत अनेक पक्षप्रवेश झाले पण एवढा घाणरेडा प्रकार बघितला नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. तसेच मी यासंदर्भात सभागृहात बोललो, असे दरेकरांनी ठाकरेंना सांगितले. दरम्यान, याआधी विधानपरिषदेमध्ये दरेकर यांनी यासर्व प्रकरणावर आवाज उठवला आहे.

Jayant Patil : देवस्थानच्या जमिनी लाटल्या जातात… सरकार बघ्याच्या भूमिकेत!

बिभीषण वारे या कार्यकर्त्याने काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. प्रवेशाचे बॅनर देखील लागले होते. पण यावरुन त्यांच्यावर जवळपास 50 गुंडांनी हल्ला केला. त्याच्या डोक्यावर 19 वार झाले. याविरोधात कडक कारवाई झालीच पाहिजे, असे दरेकर आज सभागृहात म्हणाले आहेत.

Tags

follow us