Download App

आदित्य ठाकरेंना जमिनीवर आणायचं काम शिंदेंनी केलं; अयोध्या दौऱ्यावर केलेल्या टीकेला गोगावलेचं सणसणीत उत्तर

  • Written By: Last Updated:

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शिंदे गटाचे आमदार हे आजपासून दोन दिवसाच्या अयोध्या दौऱ्यावर (Ayodhya tour) असणार आहे. त्यांच्या या दौऱ्या संदर्भात आता अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहे. विरोधी पक्षनेते अजित यांनी या दौऱ्यावर शिंदे गटावर निशाणा साधला होता. त्यानंतर ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरेंनही शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला होता. रावण राज्य चालवणारे अयोध्येला चालले आहेत, असा शब्दात त्यांनी शिंदे गटावर टीकास्त्र डागलं होतं. दरम्यान, आता शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले (Bharat Gogavele) यांनी आदित्य ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. आदित्य ठाकरेंना जमीनीवर आणायचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं, असं ते म्हणाले.

आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाच्या अयोध्या दौऱ्याविषयी बोलतांना सांगितलं होतं की, आता कलियुग आहे. रावण राज्य चालवणारे अयोध्येला चालले आहेत. पण आम्ही या राज्यात पुन्हा एकदा रामराज्य आणू, असं त्यांनी सांगितलं होतं. त्यांच्या या टीकेवर बोलतांना गोगावले यांनी सणसणीत उत्तर दिलं. आदित्य ठाकरे आमच्यावर रावण राज्य चालवणारे असं म्हणतात. पण, आदित्य ठाकरे यांच्याच काळात राज्यात रावणातं राज्य होतं. ते आम्ही संपवलं आणि राज्यात रामराज्य आणलं, असे ते म्हणाले.

गोगावले म्हणाले की, मुख्यमंत्री शिंदे यांनी रामाचं नाही, तर रावणाचं राज्य संपवलं. त्यांच्याच काळात रावणाचं राज्य होतं. त्यामुळंच कोणाला भेटी नाही, गाठी नाही. हवेत चालले होते, आदित्य ठाकरे. त्यांना जमीनीवर आणायचं काम एकनाथ शिंदे यांनी केलं आहे, असं ते म्हणाले.

BJP Mission South : दक्षिणेत भाजपच्या ‘कमळा’समोरची आव्हाने अन् राजकीय समीकरणं 

यावेळी बोलतांना गोगावले यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचाही समाचार घेतला. संजय राऊत यांनीही अयोध्या दौऱ्यावरून शिंदे गटावर सडकून टीका केली. जे सध्या सत्तेत आहेत, त्यांना अयोध्येचा मार्ग आम्हीच दाखवला, प्रभू श्रीराम हे सत्यवचनी होते. ते सचोटी आणि सत्याचे प्रतिक होते. त्यामुळं एकनाथ शिंदे हे अयोध्येला जाणार असतील तर तिथं जाऊन त्यांनी सत्याचा बोध घेऊन यावे, असा टोला त्यांनी लगावला होता. पण प्रभू श्रीराम हे गद्दारांना आशिर्वाद देत नाहीत, असं वक्तव्यही त्यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर बोलतांना भरत गोगावले यांनी टोलेबाजी केली. गोगावले म्हणाले की आम्हाला अयोध्या माहितीच नव्हती. संजय राऊतांनाच अयोध्या माहिती होती का? परत कधी परिपाठ केला का त्यांनी? वारकरी सांप्रदायाची मंडळी सांगत असतात की, पंढरपूरची वारी करा, अयोध्येची वारी करा…. त्याप्रमाणे त्यांनी 2019 ला अयोध्येचा दौरा केला होता. त्यानंतर ते कधी अयोध्येला गेलेत का? असा सवाल त्यांनी केला.

गोगावले म्हणाले की, संजय राऊत हे रात्रभर झोपत नाहीत. दुसऱ्या दिवशी आपल्याला नेमकं काय बोलायचं, याचं ते रात्रभर प्लानिंग करत असतात. पण, आम्ही प्रामाणिकपणे अयोध्येला चाललो आहोत. निसंकोचपणे रामाचं दर्शन घ्यायला चाललोय.

 

Tags

follow us