BJP Mission South : दक्षिणेत भाजपच्या ‘कमळा’समोरची आव्हाने अन् राजकीय समीकरणं

  • Written By: Published:
BJP Mission South : दक्षिणेत भाजपच्या ‘कमळा’समोरची आव्हाने अन् राजकीय समीकरणं

BJP Mission South : आज देशात भाजपची ताकद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात भाजपचे सरकार आहे. काही दिवसांपूर्वी ईशान्येतही कमळ फुलले आहे. उत्तर भारतातील ज्या राज्यांमध्ये भाजप सत्तेत नाही तिथे हा पक्ष प्रमुख विरोधी पक्ष म्हणून कार्यरत आहे. पश्चिम बंगालमध्येही तीच स्थिती आहे. मात्र, आता कर्नाटकात विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाली आहे. त्यात भाजपला दक्षिणेत कमळ फुलवण्याची तीव्र इच्छा आहे. यासाठीच यावेळी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप दक्षिणेतील विजयाची सर्व समीकरणे बनवत आहे.

‘ज्या काँग्रेसनं आम्हाला तुडवंल, संपवलं त्यांच्यासोबत तुम्ही’.. गुलाबराव ठाकरेंवर भडकले!

दक्षिण भारतातील कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या सहा राज्यांपैकी सध्या फक्त कर्नाटकात भाजपचे सरकार आहे. पुद्दुचेरीमध्येही भाजप युतीसह सत्तेत आहे. या सर्वामध्ये दक्षिणेत विजयाचा रथ मिळवण्यासाठी भाजपकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहे. मात्र, हा विजय रथ मिळवताना पक्षासमोर काही आव्हाने आहेत. येथे नेमकी रायकीय समीकरणं काय आहेत भाजपसमोरील आव्हाने नेमकी कोणती हे आपण आज समजून घेऊया.

Jitendra Awhad : रॅपरला वाचवण्यासाठी आव्हाड घेणार पोलीस स्टेशनमध्ये धाव

भाजपसाठी दक्षिण महत्त्वाची का आहे?
दक्षिण भारतातील राज्यांमध्ये लोकसभेच्या 130 जागा आहेत, त्यापैकी फक्त 29 जागा भाजपकडे आहेत. त्यापैकी 25 एकट्या कर्नाटकातील आहेत. तर 2019 मध्ये तेलंगणात चार जागा भाजपनं जिंकल्या होत्या. यावरून इतर राज्यात भाजपची अवस्था कशी आहे, हे समजू शकते. दक्षिणेला ठळकपणे घेण्यामागे आणखी एक कारण आहे. ते म्हणजे गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत उत्तर भारतातील प्रमुख राज्यांमध्ये भाजपला बंपर जागा मिळाल्या आहेत. अशा स्थितीत इथे जागा कमी पडल्या तर दक्षिणेतून त्याची भरपाई करता येईल, याची काळजी भाजप घेत आहे.

CR Kesavan Join BJP : तीन दिवसात काँग्रेसला तीन धक्के! पहिल्या भारतीय गव्हर्नर जनरलचा पणतू भाजपात

कर्नाटकात चाचणी
पुढील महिन्यात होणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपच्या दक्षिण योजनेची कसोटी लागणार आहे. दक्षिणेतील आपला एकमेव बालेकिल्ला राखण्याचे आव्हान भाजपसमोर आहे आणि त्याचवेळी येथील निकालांचा परिणाम इतर राज्यांवरही होणार आहे, जिथे या वर्षी निवडणुका होणार आहेत. कर्नाटकात भाजपचा पराभव झाला, तर वर्षअखेरीस होणाऱ्या तेलंगणाच्या निवडणुकीत भाजपला सत्तेवर येणे फार कठीण जाईल. तेलंगणामध्ये यावेळी भाजपला मोठ्या आशा आहेत.

दक्षिण भारतात भाजपसमोर आव्हान
आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळसारख्या राज्यांमध्ये भाजपचा पाया खूपच कमकुवत आहे, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि केरळमध्ये भाजपकडे लोकसभेची एकही जागा नाही. त्याचबरोबर आंध्र प्रदेश आणि केरळमध्ये पक्षाचा एकही आमदार नाही. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आंध्र प्रदेशात भाजपला केवळ 1 टक्के मते मिळाली होती.

आम्ही ‘त्या’ निर्णयाची वाटच पाहतोय; सत्तासंघर्षावर शरद पवारांचे सूचक वक्तव्य

हिंदी पार्टी टॅग
आंध्र प्रदेशप्रमाणेच तामिळनाडूतही भाजपसमोर मोठे आव्हान आहे. भाजपची प्रतिमा हिंदूवादी पक्ष अशी आहे आणि तामिळनाडू ही द्रविड चळवळीची भूमी आहे. यासोबतच हिंदी पक्षाचा टॅग भाजपसमोरचे प्रमुख आव्हान आहे. भाजपच्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर अलीकडच्या काळात द्रमुकने पुन्हा एकदा हिंदीचा मुद्दा उचलण्यास सुरुवात केली आहे. तामिळनाडूमध्ये द्रविड चळवळीच्या तुलनेत मंदिरांभोवती राजकारण आणण्याचा हिंदी पक्षाचा प्रयत्न आहे. मंदिरे कोणी ताब्यात घ्यायची, असा सवाल भाजप उपस्थित करत आहे. भाजपसोबत समान विचारसरणी असलेल्या विहिंपसारख्या संघटना यात पुढे आहेत. भाजपचा आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे त्याचे AIADMK सोबत चांगले संबंध आहेत आणि युती करून पक्ष आपला पाया अधिक भक्कम करू शकतो.

केरळातील परिस्थीती कशी?
दक्षिणेतील आणखी एक महत्त्वाचे राज्य केरळमध्ये भाजप जोरदार प्रयत्न करत आहे, पण यश मिळत नाहीये. भाजपचा येथे एकही आमदार नाही. तर, दुसरीकडे त्यांची मूळ संघटना RSS येथे 4500 पेक्षा जास्त शाखा असल्याचा दावा करत आहे. केरळमध्येही हिंदुत्ववादी पक्षाच्या टॅग भाजपला अवघड जात आहे. राज्यात मोठ्या प्रमाणातील लोकसंख्या ख्रिश्चन समाजाची असून भाजप याकडे लक्ष देत आहे. काँग्रेस नेते ए.के. अँटोनी यांचा मुलगा अनिल अँटोनी याच्या पक्षात अलीकडेच समावेश केल्याने भाजपला येथे विजय मिळवणे काहीसे सोपे जाईल असे बोलले जात आहे. कर्नाटक आणि तेलंगणा वगळता भाजपकडे दक्षिणेकडील राज्यांमध्ये एकही मोठा नेता नाही. कर्नाटकसारख्या राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी भाजपला येडियुरप्पा यांच्यासारख्या करिष्माई नेत्याची गरज आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube