भाजपने शिंदेंना पुन्हा CM करण्याचा शब्द दिला होता; शिवसेना नेत्याच्या दाव्याने मुख्यमंत्रिपदाचा पेच वाढला…

महायुती पुन्हा सत्तेत आल्यास तुम्हालाच मुख्यमंत्रीपद दिले जाईल, असे आश्वासन भाजपने दिले होता, असा दावा शिंदे यांच्या निकटवर्तीय नेत्याने केला.

Eknath Shinde

Eknath Shinde

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीत महायुतीनं दमदार कामगिरी केली. महायुतीला (Mahayuti) स्पष्ट बहुमत मिळाले. भाजपने (BJP) 132 जागा जिंकल्या आहेत, तर शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने अनुक्रमे 56 आणि 40 जागा जिंकल्या. मात्र, महायुतीत मुख्यमंत्रिपदावरुन पेच कायम आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनाच पुन्हा मुख्यमंत्रिपद देण्यात यावं, असा आग्रह शिवसेना नेत्याकडून होत आहे. त्यानंतर आता शिंदेंच्या निकटवर्तीय नेत्यानं खळबळजनक दावा केला.

भाजपने शिंदेंना पुन्हा CM करण्याचा शब्द दिला होता; शिवसेना नेत्याच्या दाव्याने मुख्यमंत्रिपदाचा पेच वाढला… 

विधानसभा निवडणुकीत शिंदेंनाच मुख्यमंत्री केलं जाईल, असा शब्द भाजपच्या वरिष्ठ पातळीवरुन देण्यात आला होता, असा दावा एकनाथ शिंदेंच्या निकटवर्तीय नेत्याने केला.

विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला प्रचंड बहुमत मिळाले आहे. मात्र महायुतीला अद्यापही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवता आलेला नाही. यावेळी भाजपने मुख्यमंत्रीपद आपल्याकडे घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सत्ता स्थापनेचा पेच वाढला आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेत्याने हा दावा केला. त्यामुळं मुख्यंमंत्रीपदाचा पेच आणखी वाढला आहे.

पुन्हा राजकीय भूकंप, एकनाथ शिंदेनंतर चंद्रशेखर बावनकुळे घेणार पत्रकार परिषद 

शिंदेंच्या निकटवर्तीय नेत्याचा दावा काय?
लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात मोठा झटका बसला आहे. महायुतीला केवळ 17 जागा मिळाल्या. यानंतर भाजपकडून शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन देण्यात आलं होतं. महायुती पुन्हा सत्तेत आल्यास तुम्हालाच मुख्यमंत्रीपद दिले जाईल, असे आश्वासन भाजपने दिले होते, असा दावा शिंदे यांच्या निकटवर्तीय नेत्याने केला. त्यावेळी कोणत्या पक्षाच्या किती जागा निवडून येतील याचा कोणताही विचार केला जाणार नाही, असंही या नेत्याने म्हटलं आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत भाजपने 132 जागा जिंकल्या आहेत. तर शिंदे यांच्या शिवसेनेला 57 जागांवर यश मिळालं. मुख्यमंत्रीपदाचा शब्द आधीच देण्यात आला होता, असा दावा शिवसेना नेत्याकडून करण्यात आल्यानं 2019 मधील घडामोडींची पुनरावृत्ती होतांना दिसतेय. त्यावेळी भाजपने मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन दिले होते. अमित शाहांनी मातोश्रीवर येऊन बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत याबद्दलचं आश्वासन दिलं होतं, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर आता शिंदेंची शिवसेनाही तसाच दावा करत आहे.

Exit mobile version