पुन्हा राजकीय भूकंप, एकनाथ शिंदेनंतर चंद्रशेखर बावनकुळे घेणार पत्रकार परिषद

  • Written By: Published:
पुन्हा राजकीय भूकंप, एकनाथ शिंदेनंतर चंद्रशेखर बावनकुळे घेणार पत्रकार परिषद

Chandrashekhar Bawankule : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. मात्र महायुतीमध्ये (Mahayuti) मुख्यमंत्री पदावरून मतभेद निर्माण झाले असल्याची माहिती येत आहे. शिवसेना (Shiv Sena) आणि भाजपकडून (BJP) देखील मुख्यमंत्री पदावर दावा करण्यात येत असल्याने मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

यातच एक मोठी बातमी समोर आली भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) आज दुपारी 4 वाजता नागपूर येथे पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेमध्ये चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणणार याबाबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

विशेष म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद संपल्यानंतर पत्रकार परिषद घेत असल्याने याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी देंवेंद्र फडणवीस यांच्या नावाला मंजुरी दिल्याने एकनाथ शिंदे नाराज झाले आहे. भाजप एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पद किंवा केंद्रीय मंत्रिमंडळात पद देण्यासाठी तयार आहे मात्र एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या या ऑफरला नाकारले आहे.

मोठी बातमी! डोंगरीत इमारतीला भीषण आग, अनेक लोक अडकले

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने 131 जागा जिंकल्याने मुख्यमंत्री भाजपचा होणार असा दावा भाजपकडून करण्यात येत आहे तर एकनाथ शिंदे यांच्या नेतुत्वाखाली महायुतीने प्रचंड बहुमत मिळावल्याने पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होणार असा दावा शिवसेनेकडून करण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीने 288 पैकी 236 जागांवर विजय प्राप्त केला आहे तर महाविकास आघाडीला फक्त 46 जागांवर विजय मिळवता आला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube