Maharashtra Politics : सध्या राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात दिलेल्या निकालाचीच चर्चा सुरू आहे. नार्वेकरांनी आपल्या निकालात (MLA Disqualification) दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवले त्यामुळे शिंदे गटाने नाराजी व्यक्त करत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. तर दुसरीकडे ठाकरे गटानेही सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. आता शिंदे गटाने ठाकरे गटाच्या आमदारांविरोधात जी याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी ठाकरे गटाच्या आमदारांविरोधात याचिका दाखल केली आहे.
एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना खरी शिवसेना असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्षांनी दिला. मग शिंदे गटाकडून दिलेला व्हीप लागू का होऊ शकत नाही. हा व्हिप न मानणाऱ्या ठाकरे गटातील 14 आमदारांना अपात्र करा, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. त्यामुळे आता या सुनावणीत ठाकरे गटाचे आमदार अपात्र होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Uddhav Thackeray : ‘हुडी किंवा गॉगल घालून कुणाला भेटण्याची गरज मला नाही’ ठाकरेंच्या निशाण्यावर कोण ?
राहुल नार्वेकरांनी आमदार अपात्रता प्रकरणात निकाल देताना शिंदे गटाबरोबरच ठाकरे गटाच्या आमदारांनाही पात्र ठररलं. त्यांच्या या निकालावर शिंदे गटाने नाराजी व्यक्त केली होती. आपणच खरी शिवसेना आहोत मग आपला व्हीप कसा लागू होत नाही असा सवा करत शिंदे गटाने न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. त्यामुळे ठाकरे आणि शिंदे गटासाठी आजचा दिवस महत्वाचा ठरणार आहे.
नार्वेकरांनी दिलेला निकाल काय ?
दरम्यान, नार्वेकरांनी सुरूवातील विधानसभा अध्यक्षांनी खरी शिवसेना कोणाची यावर निर्णय दिला होता. यावेळी नार्वेकरांनी निर्मयम देतांना सांगितलं की, दोन्ही गटाच्या नेत्यांनी खरी शिवसेना आमचीच असल्याचा दावा केला. मात्र, दोन्ही गटांनी वेगवेगळ्या घटना दिल्या. उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या घटनेवर तारखेचा उल्लेख नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाने दिलेली घटना मान्य करण्यात आली. यावरही तारीख नव्हती. निवडणूक आयोगाकडे 1999 च्या संविधानाची प्रत होती. त्यामुळे 2018 मध्ये केलेल्या बदलांचा विचार करण्यात आला नाही. ठाकरे गटाने 2018 मध्ये केलेली दुरुस्ती चुकीची असल्याचे नार्वेकर यांनी म्हटले होते.
Rahul Narvekar : नार्वेकरांच्या ‘या’ पाच निर्णयाविरोधात ठाकरे गट सुप्रीम कोर्टात जाणार