Download App

आमदार अपात्रतेची पुढील सुनावणी 20 तारखेला, आजच्या सुनावणीत काय-काय झालं?

  • Written By: Last Updated:

MLA Disqualification Case : गेल्या वर्षी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यानं शिवसेनेत (Shivsena) फुट पडली. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. यानंतर ठाकरे गटाचे 16 आमदारांच्या अपात्रतेची (MLA Disqualification Case) याचिका दाखल केली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आमदार अपात्रतेचं प्रकरण प्रलंबित आहे. मे महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे पाठवले होते. आज या प्रकरणाची तिसरी सुनावणी झाली. यावेळी सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घेण्याची मागणी ठाकरे गटाने केली.

Sonu Sood चा आणखी एक सामाजिक उपक्रम; विद्यार्थ्यांचं भवितव्य उज्वल करणार 

आजच्या सुनावणीला उद्धव ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई, आमदार अनिल परब, आमदार अजय चौधरी आणि शिवसेना ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत विधानभवनात उपस्थित होते. ठाकरे आणि शिंदे गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला.

शिंदे गटाचे वकील यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितलं की, आज तीन तास दोन्ही वकिलांचा युक्तीवाद झाला. आता यावर 20 तारखेला निर्णय होणार आहे. आहे. आजच्या सुनावणीत प्रत्येक याचिकेवर स्वतंत्र सुनावणी घ्यावी, अशी शिंदे गटाने मागणी केली. कारण, या सर्व याचिका म्हणजे, वेगवेगळे मुद्दे आहेत. वेगवेगळ्या घटना आहेत. शिवाय, सर्व आमदारांना वैयक्तिक बाजू मांडण्याचा अधिकारर आहे. त्यामुळं सर्व याचिकावर एकत्र करून सुनावणी घेणं योग्य नाही. प्रत्येक आमदारांची वेगवेगळी परिस्थिती आहे. प्रत्येक आमदाराने वेगळ्या परिस्थितीत निर्णय घेतला, असं शिंदे गटाच्या वकीलांनी सांगितलं.

तर ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी सांगितलं की, कायद्याचा किस पाडण्याचा प्रयत्न होत आहे. आमदार अपात्र हा एकच विषय आहे. हे पाहता यावर एकत्रित निर्णय घ्यावा. 10 शेड्युल नुसार 16 आमदार आणि त्यानंतर 22 आमदार यांनी केलेलं कृत्य एकसारखंच आहे. त्यामुळं एकत्रित सुनावणी घ्यावी. मात्र, डोक्यावरची अपात्रतेची तलवार टाळण्यासाठी कारवाई रेंगाळत कशी राहील ही शिंदे गटाची भूमिका दिसते. त्यामुळं हे प्रकरण पुढे ढकलण्यात येत आहे. हा वेळकाढूपणा आहे. आम्ही या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊ, असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, सुनावणी एकत्रित घ्यावी की स्वतंत्र घ्यावी यावर २० तारखेला यावर निकाल दिला जाईल असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं. त्यामुळं पुढच्या सुनावणी वेळी काय होतं, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us