Sonu Sood चा आणखी एक सामाजिक उपक्रम; विद्यार्थ्यांचं भवितव्य उज्वल करणार
Sonu Sood : कोरोना काळात गरिबांसाठी देवासारखा धावून आलेला सोनू अद्याप मदत कार्यात गुंतला आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून सोनू लोकांना वेगवेगळ्या प्रकारे मदत करत आहे. कधी तो कोणाला उपचारांसाठी मदत करताना दिसतो (Social media) तर कधी मुलांच्या शिक्षणामध्येही मोलाचा वाटा उचलत असतो. गेल्या काही दिवसाखाली त्याने एका तरुणाला पायलट (pilot)बनण्यास मदत केली होती. त्यानंतर आता सोनूने पुन्हा एक सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे.
सोनू सूदचा आणखी एक सामाजिक उपक्रम…
यावेळी सोनू सूदने त्याच्या सूद चॅरिटी फाऊंडेशन आणि भारतीय क्रिएटिव्ह युनिटीसह कला शक्ती 2023-24 लॉंच करणार आहे. त्यामध्ये कला आणि सर्जनशील कला शिक्षणाच्या जगात क्रांती घडवून आणली जाणार आहे. विद्यार्थ्यांना कला शाखेतील सर्वसमावेशक डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी विनामूल्य प्रवेश दिला जाणार आहे.
एकनाथ खडसेंना मोठा दिलासा! भोसरी भूखंड गैरव्यवहारप्रकरणी जामीन मंजूर
कलाकारांना आणि सर्जनशील कलाकृती असलेल्या व्यक्तींना सशक्त करणे हा या अनोख्या उपक्रमाचा उद्देश आहे. तर कला शक्ती 2023-24 कला शिक्षणाचे लोकशाहीकरण करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलणार आहे. सूद चॅरिटी फाऊंडेशन आणि ICU मधील भागीदारी ही नक्कीच उत्सुकता असणारी आहे. कला शक्ती 2023-24 हे सर्जनशीलतेला चालना देण्यासाठी आणि महत्त्वाकांक्षी कलाकारांसाठी उज्ज्वल भविष्य सक्षम करण्याच्या दिशेने एक अग्रगण्य पाऊल आहे.
‘देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले तर आम्हाला….’; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
दरम्यान सोनूचे हे चाहते केवळ भारतातच नाहीत तर जगभरात त्याचे चाहते आहेत. त्याचा प्रत्यय नुकताच आला आहे. त्याला सोशल मिडीयावर प्रचंड फॉलोअर्स आहेत. त्याच्या अभिनयाबरोबरच तो त्याच्या दयाळू आणि दानशूरपणामुळे जास्त ओळखला जातो. कारण त्यान कोरोला काळात अनेकांना मदत करत मनं जिंकली आहेत.