ठाकरेंचा युक्तिवाद संपला; आजपासून शिंदे गटाची ‘बॅटिंग’, शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज सुनावणी

Shiv Sena Name and Symbol Case शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाच्या वादावर ठाकरे गटानंतर शिंदे गटाकडून युक्तिवादाला सुरुवात होणार.

Shiv Sena Name and Symbol Case

Shiv Sena Name and Symbol Case

Shiv Sena Party Name & Symbol Case; Supreme Court Hearing: शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्हावरून (Shiv Sena Name and Symbol Case) सुरू असलेल्या ठाकरे आणि शिंदे गटातील कायदेशीर संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात आज (2 सप्टेंबर) पुन्हा सुनावणी होणार आहे. दुपारी 2 वाजल्यानंतर या प्रकरणातील पुढील युक्तिवादाला सुरुवात होईल. आतापर्यंत ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी बाजू मांडली असून, आता शिंदे गटाकडून युक्तिवाद केला जाणार आहे.

हा विषय तुमचा नाही! चर्चेला आलेल्या जिल्हाधिकारी अन् पोलीस अधीक्षकांचा प्रस्ताव जरांगे पाटलांनी फेटाळला

ठाकरे गटाने ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह गोठवण्याची मागणी न्यायालयासमोर केली आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी आणि नीरज किशन कौल बाजू मांडणार आहेत. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे राजकीय आणि कायदेशीर वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

एकनाथ शिंदेंची कायदे तज्ज्ञांसोबत चर्चा

सुनावणीपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीमध्ये आपल्या कायदेशीर पथकासोबत चर्चा केली. पक्ष आणि निवडणूक चिन्हावरील दावा अधिक ठोसपणे मांडण्यासाठी उपलब्ध कायदेशीर पर्याय, पुरावे आणि संबंधित मुद्द्यांचा आढावा घेण्यात आला. सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटाची बाजू प्रभावीपणे मांडली जावी, यासाठी कायदे तज्ज्ञांशी सविस्तर चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे.

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; कुकडी पाटबंधारे प्रकल्पाच्या सुधारित खर्चाला राज्य सरकारची मंजुरी

शिंदे गटाकडे शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह कायम राहावे, यासाठी कायदेशीर बाबींचा बारकाईने विचार करून न्यायालयासमोर भूमिका मांडण्याची तयारी करण्यात आली आहे.

‘धनुष्यबाण’ गोठवण्याच्या मागणीवर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाच्या ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवण्याच्या मागणीवर तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांच्या मते, हे चिन्ह बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेचे आणि शिवसैनिकांच्या भावनेचे प्रतीक आहे. त्यामुळे चिन्ह गोठवण्याची मागणी ही केवळ निवडणूक चिन्हाशी संबंधित नसून बाळासाहेबांच्या विचारांचा आणि जनतेच्या कौलाचा अवमान करण्यासारखी असल्याचे त्यांनी म्हटले.

विद्यार्थ्यांचा विद्यापीठात राडा; परीक्षेत पुन्हा नापास केल्याचा आरोप, पोलिसांना पाचारण

2019 नंतर शिवसेनेच्या विचारधारेत बदल झाल्याचा आरोपही शिंदे यांनी केला. आपण बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा पुढे नेत असल्याचे सांगत ‘धनुष्यबाण’ हे शिंदे गटासाठी श्रद्धेचा विषय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ठाकरे गटाचा नेमका युक्तिवाद काय?

ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी मागील सुनावणीत आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवला. शिवसेनेत झालेली कथित फूट आणि त्यानंतरच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संबंधित आमदार अपात्र ठरायला हवे होते, असा युक्तिवाद त्यांनी केला.

निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह देताना विधिमंडळातील बहुमताचा आधार घेतला. मात्र संबंधित आमदार पक्षांतरबंदी कायद्यानुसार अपात्र ठरले, तर आयोगाच्या निर्णयाचा मूळ आधारच बदलू शकतो, असा दावा ठाकरे गटाने केला आहे.

धर्मवीर गडावरील छत्रपती संभाजी महाराज स्मारकासाठी 5 कोटींचा निधी मंजूर ; गडाच्या संवर्धनाला मिळणार गती

विधानसभा अध्यक्षांच्या निर्णय प्रक्रियेवरही कामत यांनी प्रश्न उपस्थित केले. पक्षांतराच्या मुद्द्यावर अंतिम निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घ्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली. संबंधित आमदारांनी पक्षत्याग केला असल्याचे न्यायालयाने ठरवले, तर त्याचा परिणाम निवडणूक आयोगाच्या पक्ष आणि चिन्हासंदर्भातील निर्णयावरही होऊ शकतो, असा ठाकरे गटाचा युक्तिवाद आहे.

आता शिंदे गटाची बाजू

ठाकरे गटाचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर आता शिंदे गटाकडून आपली भूमिका मांडली जाणार आहे. मुकुल रोहतगी आणि नीरज किशन कौल हे शिंदे गटाची बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडतील. त्यामुळे ‘धनुष्यबाण’ चिन्ह, पक्षाचे नाव आणि आमदारांच्या अपात्रतेशी संबंधित मुद्द्यांवर शिंदे गट कोणते कायदेशीर युक्तिवाद करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version