हा विषय तुमचा नाही! चर्चेला आलेल्या जिल्हाधिकारी अन् पोलीस अधीक्षकांचा प्रस्ताव जरांगे पाटलांनी फेटाळला

याच दिवशी म्हणजे तीन वर्षांपूर्वी आमच्यावर मोठा लाठीचार्ज केला. आमच्या लेकरांसह माता माऊल्यांची डोकी फुटली होती.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 09 01T215625.605

तुमचा हा विषयच नाही, तुम्हाला हे चौथी नापास मंत्री पुढं घालत आहेत. पण तुम्हाला मी सन्मानाने सांगतो तुम्ही (Jarange) या भानगडीत पडू नका अशा शब्दात जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल आणि पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू हे चर्चेला आले असा संवाद साधला. तसंच, गेल्या तीन वर्षात पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी कधीही चर्चेला आलेले नाहीत. मग आत्ताच तुम्हाला का पुढं घातलं जात आहे असा प्रस्नही जरांगे पाटील यांनी यावेळी उपस्थित केला. ते अंतरवाली सराटीत उपोषणस्थाळावरून बोलत होते. दरम्यान, जरांगे पाटील यांनी त्यांच्या उपोषण सोडण्याचा प्रस्ताव फेटाळल्याने जिल्हाधिकारी अन् पोलीस अधीक्षकांना रिकाम्यान हाताने परतव लागलं.

दरम्यान, याच दिवशी म्हणजे तीन वर्षांपूर्वी आमच्यावर मोठा लाठीचार्ज केला. आमच्या लेकरांसह माता माऊल्यांची डोकी फुटली, कुणाचे हात मोडले, कुणाचे पाय मोडले. आमच्या डोळ्याने आमच्या लोकांच्या रक्ताचा चिखल आम्ही पाहिलाय असं बोलताना जरांगे पाटील अक्षरश: ढसाढसा रडले. यावेळी काहीवेळ मोठ शांततेचं आणि भावनिक वातावरण निर्माण झालं होत.

माजी आमदार शहाजी बापू जरांगेंच्या भेटीला; थेट मंत्री शंभूराज देसाईंना फोन लावत म्हणाले

जरांगे पाटील यांची तब्येत खराब झाली आहे. आज त्यांनी उपचारही घेतले नाहीत. सर्व लोकांसमोर मी त्यांना विनंती करते की त्यांनी आता उपोषण सोडवाव. त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्यासाठी आम्ही उद्यापासूनच पूर्ण करण्यास सुरूवात करणार आहोत असं आश्वासनही आशिमा मित्तल यांनी यावेळी दिलं. त्याचबरोबर उपस्थित असलेल्या लोकांना तुम्ही जरांगे पाटील यांना उपोषण सोडवण्यासाठी विनंती करा असं आवाहनही केलं.

जे उपोषण सुरू आहे ते तुमच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी आहे. सर्व मागण्यांसाठी सरकार सकारात्मक आहे. संविधानिक चौकटीला धक्का न लावता सर्व मागण्या सरकार मान्य करण्यास तयार आहे. यातील महत्वाची मागणी म्हणाजे, ज्या बांधवांनी या आरक्षण लढ्यात बलिदान दिलं आहे त्यांच्या कुटुंबाला 10 लाखांची आर्थिक मदत आणि ज्यांनी नोकरी द्यावी यासाठी मागणी केली त्यांचाही सकारात्मक विचार सुरू आहे. दुसरी जी मागणी आहे की 58 लाखातील सर्व नोंदीनुसार प्रमाणपत्र मिळावं तर त्यासाठी सर्व ग्रामपंचायत पातळीवर आम्ही काम करू असं आश्वासनही जिल्हाधिकारी मित्तल यांनी दिलं आहे.

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी जरांगे पाटलांशी बोलताना म्हटले की, आम्हाला आपली खुप काळजी आहे म्हणून इथे आलो आहे. जे शिबिर लावतात, त्यात जास्तीत जास्त प्रमाणपत्र देण्याचा प्रयत्न करत आहोत. शक्य आहे ते आपण करत आहोत. सरकार सराकात्मक आहे. हैदराबाद गॅजेटच्या नोंदींनुसारही प्रमाणपत्र दिले जात आहे. सातारा आणि कोल्हापूर गॅजेटवरही प्रक्रिया सुरू आहे. जात प्रमाणपत्रांसाठी नोडल अधिकारी नेमणार आहोत. प्रांत अधिकारी यांनी दिलेला दाखला मोठा पुरावा मानला जातो. व्हिलिडीटी फार कमी केसेसमध्ये लागते. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शासन काहीतरी मार्ग काढणार आहे. एकही मुलाचे नुकसान होणार नाही.

पुढे बोलताना जरांगे पाटलांनी म्हटले की, आपल्या कार्यालयात 6 व्हॅलिडिटी पडून आहेत. मी आपल्या अधिकाऱ्याला फोन लावून दिला होता. 6 महिने झाले अजून काही झाले नाही. उगाच त्रास घेऊ नका. तुम्ही अभ्यास करून अधिकारी झाला आहेत. यातील एका ही मंत्र्याने पुस्तक वाचले आहे का? मला शायनिंग शिकवत आहेत. यांचं तुम्हाला ऐकावं लागत. मला रक्ताच्या उलट्या होत आहेत. मी चर्चेला तयार आहे. मंत्राला तुमचे पुस्तक वाचायला द्या येते का पाहू. तुम्ही जा आणि त्यांना सांगा जीआर आणा.

यावर बोलताना जरांगे पाटलांनी म्हटले की, तुम्ही आलात तुमचा सन्मान आहे. तुमचा वेळ वाया घालवू नका. सरकार जाणून बुजून वेळ वाया घालवत आहे. ते तुमच्या आवाक्यातले नाहीत. यानंतर तुम्ही येऊ नका, तुमच्या स्तरावरच्या गोष्टी नाहीत. तुमची फरपट करून घेऊ नका. तुमचा अपमान करत नाहीये. आमच्या मुलांचे वाटोळे झाले. 29 तारखेला 1 वर्ष झाले. प्रत्येत गावात शिबिर सुरू होऊ शकते. कशाला पाहिजे 4 महिने? सकाळी जीआर काढा. मला उद्या सकाळपासून सुरुवात पाहिजे. त्यांना सांगा तो माणूस ऐकायला तयार नाही.

पुढे भावुक होत जरांगे पाटलांनी म्हटले की, आजच्या दिवशीच आमच्या लोकांवर गोळ्या घातल्या होत्या. आमची मुल त्यांच्या आईबापाला शोधत होती. अजूनही काही लोकांना चालताही येत नाही. रक्ताच्या थारोळ्यात आमचे लोक पडले होते. इंग्रज आणी मुघलांनी जसे केले त्यापेक्षा वाईट केले. 15 दिवस रक्ताचा वास येत होता. रक्ताचा चिखल झाला होता.

Tags

follow us