Download App

शिंदे गटाला खिंडार पडणार, CM शिंदेंचे १२ आमदार ठाकरेंकडे परतणार; असीम सरोदेंचा मोठा दावा

  • Written By: Last Updated:

Asim Sarode : लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) जसजशा जवळ येत आहेत, तशा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. (Uddhav Thackeray) यांनीही आता राज्यात संपर्क दौरा सुरू केला आहे. अशातच आता
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेतील 12 आमदार पुन्हा उद्धव ठाकरेंच्या गटात सामील होणार असल्याचा दावा वकील असीम सरोदे (Advocate Asim Sarode) यांनी केला आहे. त्यामुळं एकच खळबळ उडाली आहे.

दिल्ली दारू घोटाळ्याचे ‘हैदराबाद’ कनेक्शन; माजी CM केसीआर यांच्या मुलीच्या घरी ‘ईडी’चे छापे 

चंद्रपुरात निर्भय बानो कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमावर भाष्य करताना वकील असीम सरोदेंनी शिंदे गटातील 12 आमदार ठाकरे गटात सामील होणार असल्याचं म्हटलं. विशेष म्हणजे असीम सरोदे यांनी या 12 आमदारांची नावे जाहीर केली आहेत. यावेळी बोलताना सरोदे म्हणाले, शिंदे गटातील काही आमदार हे पुन्हा उद्धव ठाकरेंकडे परतणार आहेत. त्यात आमदार श्रीनिवास वनगा, आमदार लता सोनवणे, महेंद्र दळवी, प्रकाश सर्वे, बालाजी कल्याणकर, चिमणराव पाटील, नितीनकुमार तळे, प्रदीप जैस्वाल, उदयसिंह राजपूत, महेश शिंदे, प्रकाश आबिटकर यांच्या नावाचा समावेश आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेंतर्गत शिक्षक भरती सुरू, एकूण 327 जागांसाठी मागवले अर्ज

सरोदे म्हणाले, हे शिंदे गटाचे बारा आमदार उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात येण्यास तयार आहेत. कारण, त्यांच्या लक्षात आलं आहे की, आपलं यांच्यासोबत भविष्य नाही, ज्यांची ठाणे जिल्ह्याबाहेर ओळख नाही, असा टोलाही सरोंदेंनी मुख्यमंत्री शिंदेंना लगावला. राष्ट्रवादीचेही अनेक नेते परत जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, आता उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांनी एवढं ठरवायला पाहिजे की, एकदा विकलेला नेता पुन्हा परत घेतला जाणार नाही, असं सरोदे म्हणाले.

सरोदे यांनी 12 आमदारांची नावे घेतली. मात्र, त्यातील दोन आमदार सध्या उद्धव ठाकरेंसोबत आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नडमधील आमदार उदयसिंह राजपूत आणि बाळापूरचे आमदार नितीन देशमुख हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. सरोदे यांनी नितीन देशमुख यांचं नाव नितीनकुमार तळे असं वाचलं. विशेष म्हणजे नितीन देशमुख हे नितीनकुमार तळे नावाने प्रसिध्द असून शिवसेनेच्या फुटीच्या वेळी ते शिंदे यांच्यासोबत सुरत गुवाहाटीला गेले होते. मात्र आपल्याला फसवून नेल्याचा आरोप त्यांनी केला होता.

follow us

वेब स्टोरीज